आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Shroff Will Be Seen Dubbing His Voice For Spider Man In The Hindi Version Of Spider Man: Homecoming

'Spider-Man: Homecoming' हिंदी वर्जनमध्ये सुपरमॅनची डबिंग करणार टायगर श्रॉफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हॉलिवूड चित्रपटांत बॉलिवूडच्या हिरोंचे वॉईसओव्हर करणे जणू ट्रेंडच झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ स्पायडरमॅनच्या हिंदी वर्जनसाठी आवाज देणार आहेत. ही पहिलीच वेळ असणार आहे जेव्हा टायगर कोणत्या हॉलिवूड प्रोजेक्टसाठी डबिंग करणार आहे. एक व्हिडिओ पोस्ट करताना टायगरने अनाउंस केले आहे की, मी खूप लकी आहे कारण मला हॉलिवूड चित्रपटांसाठी डबिंग करण्याची संधी मिळत आहे. मला खरे वाटत नाही की माझ्या लहानपणीच्या सुपरहिरोला मी आवाज देणार आहे. ही ती भूमिका आहे जी मिला साकारण्याची इच्छा होती. हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. 
 
काही दिवसांपूर्वीच पायरेट्स ऑफ कॅरेबियनच्या पाचव्या सीरीजसाठी कॅप्टन जॅक स्पॅरोची डबिंग अर्शद वारसीने केली होती. मागील वर्षी कॅप्टन अमेरिकाःसिविल वॉर च्या मुख्य अभिनेत्यासाठी वरुण धवनने वॉईस ओव्हर केला होता. तर जंगल बुकमधील सापाच्या आवाजासाठी प्रियंका चोप्राने आवाज दिला होता.
बातम्या आणखी आहेत...