Home »News» Tiger Zinda Hai Song Dil Diyaan Gallan Which Released Last Week

ऑनस्क्रिन लिपलॉकपासून दूर राहाणाऱ्या सलमानने जेव्हा कतरिनाला केले KISS

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 11:07 AM IST

मुंबई - सलमान खान ऑनस्क्रिन अॅक्ट्रेसला किस करताना कधी दिसलेला नाही. ऑनस्क्रिन लिपलॉक त्याला आवडत नाही, हे त्याच्या फॅन्सलाही माहित आहे. सलमानला मोठ्या पडद्यावर रोमँटिक कॅरेक्टर करणे पसंत आहे, मात्र इंटिमेट सीनची जेव्हा वेळ येते तेव्हा तो नेहमी दोन पाऊल मागे येतो. मात्र सलमान स्वतःचाच हा नियम मोडण्याची शक्यता आहे.

सलमानची अपकमिंग फिल्म 'टायगर जिंदा है'चे नवे गाणे 'दिल दिया गल्ला...' रिलीज झाले आहे. यामध्ये सलमान-कतरिनाची बेजोड केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. हे गाणे अनेक रोमँटिक मोमेंट्सने भरलेले आहे. या गाण्यातील एका सीनमध्ये टायगर अर्थात सलमान खान कतरिनला तिच्या नकळत एक किस करताना दिसतो.


- सलमान आपल्या हिरोईनच्या एवढ्या जवळ जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी 'हम आपके है कौन' मध्ये माधुरी दीक्षित आणि त्याआधी 'मैने प्यार किया' मध्ये भाग्यश्रीसोबत असे क्लोज सीन दिले आहेत. तसेच चोरून किस देखील घेतला आहे.

Next Article

Recommended