आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान-कतरिनाचा 'स्वॅग...' ने 24 तासांत यू-ट्यूबवर केला रेकॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर जिंदा है'चे पहिले गाणे 'स्वॅग से करेंगे सबका स्वागत... 'नुकतेच रिलीज झाले आहे. या म्यूझिक व्हिडिओला फॅन्सचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. हे गाणे लोकांना एवढे आवडले आहे, की रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत यू-ट्यूबवर ते सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे झाले आहे. ही माहिती  YRF Musicच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे. 

 

काय आहे ट्विटमध्ये... 
ट्विटमध्ये म्हटले आहे, की “THIS IS #SwagSeSwagat becomes World’s Most Viewed Video in 24 hrs on @YouTube. @TigerZindaHai | @BeingSalmanKhan | #KatrinaKaif | @nehabhasin4u | @VishalDadlani | @ShekharRavjiani | @VMVMVMVMVM | @yrf” 

हे गाणे ग्रीसच्या सुंदर लोकेशन्सवर शूट केले गेले आहे. या गाण्याला संगीत साज दिला आहे विशाल-शेखर यांनी आणि गाण्याचे बोल आहेत इरशाद कामिल यांचे. गाणे गायले आहे विशाल ददलानी आणि नेहा भसीन यांनी. 
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 100 डान्सर्स आहेत, तेही ग्रीस, फ्रान्स, त्रिनिदाद आणि टोबेगो येथील. हे सर्व डान्सर्स बॅलेरियन्स, हिप-हॉप आणि एफ्रो-डान्स हॉलचे डान्सर्स आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, यू-ट्यूबचे आकडे आणि गाणे... 

बातम्या आणखी आहेत...