आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीना कुमारीचा बायोपिक वादात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या वयात शाळेच्या पायऱ्या चढायच्या त्या वयामध्ये वडिलांबरोबर इच्छा नसतानाही चित्रपट स्टुडिओच्या पायऱ्या चढत बाल-कलाकार म्हणून नावारुपास आलेल्या मीना कुमारीचा बायोपीक बनवण्यात येत आहे. यामध्ये मीना कुमारीची भूमिका साकारण्यासाठी कंगना रनोटचे नाव देखील जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
मात्र मीना कुमारीचा सावत्र मुलगा ताजदार अमरोहीने जुन्या काळातील अभिनेत्रींचे बायोपीक बनवण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटल्याने वाद निर्माण झाला होता.
यावर बायोपीकचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलियाने म्हटले की, 'मीना कुमारींच्या कुटुंबातील एक सदस्य या नात्याने आम्ही अमरोहीशी संपर्क करणार आहोत. अमरोहीने कंगनाच्या निवडीवर देखील आक्षेप घेतला. शिवाय मीना कुमारीच्या जीवनावर आपण 'मीनाबाकमाल' नावाने चित्रपट बनवत असून त्याची शूटिंग देखील सुरू केली असल्याचे त्याने सांगितले. जर अमरोहीच्या बोलण्यामध्ये सत्यता असेल तर तिग्माशूंना हा बायोपीक डबाबंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, हे मात्र नक्की.