आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइटमध्ये अॅक्ट्रेसचे Sexual Harassment, ती ओरडत राहिले सर्व पाहतच होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीना दत्ता. इन्सेट राजेश. - Divya Marathi
टीना दत्ता. इन्सेट राजेश.
मुंबई - 'उतरन' मालिकेतून इच्छाच्या रोलद्वारे प्रसिद्ध झालेली अॅक्ट्रेस टिना दत्ताने जेट एअरवेजमध्ये तिची सेक्श्युअल हॅरॅशमेंट झाल्याचा आरोप केला आहे. तिच्या मते ही घटना काही दिवसांपूर्वी ती जेव्हा मुंबईहून राजकोटला एका कार्यक्रमासाठी जात होती तेव्हा घडली. त्यावेळी एका प्रवाशाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. याबाबत तिने तक्रारही केली पण कोणीही काहीच अॅक्शन घेतली नाही.

सर्वात भीतीदायक घटना..
आजवर माझ्याबरोबर घडलेली ही सर्वात भयावह घटना असल्याची प्रतिक्रिया टिनाने व्यक्त केली आहे. मी जगात अनेक ठिकाणी फिरले आहे, पण असे कधीही घडले नाही. राजकोटला जाताना मला क्रमांकाचे सीट अलॉट करण्यात आले होते. आम्ही कामासंदर्भात बोलत होतो तेवढ्यात कोणीतरी बाजुने हाताने मला स्पर्श करत असल्याचे माझ्या लक्षात आले. 31A सीटवर बसलेला राजेश नावाचा प्रवासी मला छेडण्याचा प्रयत्न करत होता. मी त्यावर ओरडले तर तो माझी माफी मागू लागला.

एअरहोस्टेसने मदत केली नाही..
टिनाने सांगितले की, तिने एअरहोस्टेस पुजा आणि अभिषेक यांना याबाबत सांगितले. पण त्यांनी तिचे काहीही ऐकले नाही. त्या माणसाचे सीट बदलतील एवढेच ते बोलत होते. त्या माणसाला खाली उतरवण्याची माझी मागणी होती. मी कॅप्टनबरोबर बोलायचे असे सांगितले. बऱ्याच प्रयत्नानंतर मला जगजीवन सिंह यांच्याशी बोलू देण्यात आले. पण तो अत्यंत वाईट व्यक्ती होती. फ्लाइट उड्डाणापूर्वीची ही घटना असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही, असे तो म्हणाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टिनाचे इतर काही PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...