आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळच्या बाबतीत \'तितली\'ने \'मोहल्ला अस्सी\'ला टाकले मागे, मिळाले \'ए\' सर्टीफिकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवोदित दिग्दर्शक कनु बहलचा 'तितली' सिनेमाने जगभरातून प्रशंसा मिळवली. मागील आठवड्यात सेन्सॉर बोर्डासमोर सिनेमा सादर करण्यात आला. सेन्सॉरने सिनेमाला 'ए' सर्टीफिकेट देऊन पास केले.
कथितरित्या, या सिनेमातील शिवीगाळ आणि अभद्र भाषेने सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अवाक झाले. एका सदस्याच्या सांगण्यानुसार, 'आम्हाला सर्व शिवीगाळ माहित आहेत, मात्र तितलीमध्ये वापरली गेलेली अभद्र भाषा आणि शिवीगाळ वेगळीच होती. ही भाषा इतर भाषेपेक्षा जरा वेगळीच आहे.'
सेन्सॉर बोर्डाचा या सिनेमाबाबत थोडा गोंधळ उडाला. कारण सिनेमातील शिवीगाळला बीप केले असते, तर संपूर्ण सिनेमा बिघडला असता. सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने सांगितले, 'हा चांगला सिनेमा असल्याने याची अभद्र भाषा स्वीकार करण्यात आली.'
सिनेमात रणवीर शौरी, अमित सियाल आणि शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमीतील काही दृश्य...