आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणी आज हायकोर्टात होणार अंतिम सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमानच्या हिट अँड रन प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी निकाल सुनावला जाणार आहे. 2002मध्ये सलमानच्या गाडीखाली एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि 4 लोक गंभीर जखमी झाले होते.
या घटनेवेळी सलमानने मद्यपान केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मुंबईतील सेशन कोर्टाने मे 2015 मध्ये सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सलमान खानने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती तसेच शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळवली होती. त्यावेळी सलमान खानने बड्या वकिलांची फौज उभी करून 24 तासांत जामीन मिळवला होता. त्यावेळी कमाल खानचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता आणि चौकशीसुध्दा झाली नव्हती. या विरोधात सलमानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यानंतर 7 महिन्यांनी दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद झाल्यानंतर आता उच्च न्यायालयाचा निर्णय काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
बातम्या आणखी आहेत...