एन्टरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार सलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर 'बजरंगी भाईजान' या सिनेमाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 350 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा हा आठवा हिंदी सिनेमा ठरला आहे. या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आमिर खान स्टारर 'पीके' आणि तर दुस-या क्रमांकावर 'धूम 3' आहे. तिसरे स्थान पटकावले आहे शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाने.
या लिस्टकडे लक्ष टाकले असता, सलमान अद्याप आमिर आणि शाहरुख खानपेक्षा बराच मागे आहे. खरं तर वर्ल्डवाइड कमाईतील टॉप 10 सिनेमांमध्ये सलमानच्या तीन सिनेमांचा समावेश आहे, मात्र त्याची सुरुवात क्रमांक सहापासून होते. या स्थानावर त्याचा 'किक' हा सिनेमा आहे.
Divyamarathi.com तुम्हाला जगभरात सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 बॉलिवूड सिनेमांविषयी सांगत आहे. या सिनेमांविषयी जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...