आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2015 : वर्षभरात सर्वात जास्त प्रॉफिटमध्ये राहिल्या 'तनू...', 'बजरंगी...'सह या 10 फिल्म्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 2015 हे वर्ष आता सरत आले आहे. यावर्षभरात रिलीज झालेल्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांची निराशा केली. मात्र काही सिनेमे असेही आलेत, जे केवळ प्रेक्षकांच्या पसंतीस पडले नाहीत, तर त्यांनी समीक्षकांकडूनही कौतुकाची पावती मिळवली. इतकेच नव्हे तर या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर भरभक्कम गल्ला जमवत नफा मिळवला. divyamarathi.com इयर एंडर सीरिजच्या या पॅकेजमध्ये अशा 10 सिनेमांविषयी सांगत आहे, ज्यांनी 100 टक्क्यांहून अधिकचा नफा कमावला.
'तनू वेड्स मनू रिटर्न्स' राहिला टॉपवर
यावर्षी सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा ठरला दिग्दर्शक आनंद एल. राय यांचा 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हा सिनेमा. आनंद एल. राय आणि कृषिका लुल्ला या सिनेमाचे निर्माते आहेत. कंगना रनोट आणि आर. माधवन स्टारर या सिनेमाचा निर्मिती खर्च 31 कोटींच्या घरात होता. तर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तब्बल 152 कोटींचा गल्ला जमवला. यानुसार या सिनेमाचा नफा 121 कोटी म्हणजेच 390 % इतका राहिला.
दुस-या क्रमांवर 'बजरंगी भाईजान'
नफा कमावणा-या सिनेमांमध्ये दुस-या स्थानावर आहे सलमान खान प्रॉडक्शनचा 'बजरंगी भाईजान'. कबीर खान यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर या सिनेमाचा निर्मिती खर्च 90 कोटी इतका होता. तर बॉक्स ऑफिसवरच्या कमाईचा आकडा 320 कोटींच्या घरात राहिला. अर्थातच या सिनेमाचा नफा 256 % म्हणजेच 230 कोटी इतका होता.
नोटः सर्व आकडे ट्रेड अॅनालिस्टच्या Tweets आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन प्रकाशित करणा-या वेबसाइट्सवर आधारित आहेत.
बातम्या आणखी आहेत...