आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FTIIच्या वादावर आमिरने बाळगले मौन, पत्नी किरणलाही बोलू दिले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सिनेमांच्या रिलीजवेळी सामाजिक विषयांवर मनमोकळा बोलणा-या आमिर खानने शनिवारी (18 जुलै) FTIIच्या प्रश्नावर मौन बाळगले. या प्रश्नावर सलमानपासून रणबीर कपूरपर्यंत सर्वांनी उत्तर दिले.
मुंबई- मागील वर्षी मुंबईचे प्रसिध्द फिल्म फेस्टिव्हल आर्थिक संकटाने रद्द होणार होते, तेव्हा आमिरने 11 लाखांची मदत केली होती. नोव्हेंबर मेगन माइलनच्या डॉक्युमेंट्री 'ऑफ्टर माई गार्डन ग्रोज'ला पाठिंबा देण्यासाठीसुध्दा तो पुढे आला होता. त्याने आतापर्यंत दर्शवले, की चांगला सिनेमा आणि त्याच्याशी निगडीत घटनांना तो पाठिंबा देतो. परंतु शनिवारी (18 जुलै) या अपेक्षेच्या उलट झाले.
मागील एका महिन्यापासून देशभरात पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थी उपोषण करत आहेत. यावरून अनेक वादांना तोंड फुटले आहे. ऑस्कर विजेता रेसुल पूकुट्टीपासून रणबीर कपूर तसेच सलमान खानसुध्दा याविषयी बोलले. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या निर्णयाला योग्य म्हटले. परंतु आमिरने शनिवारी या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले.
त्याने ईदनिमित्त फक्त ईदविषयीच बोलणार, असे सांगितले. त्याने पत्नी किरण रावलासुध्दा याविषयी बोलण्यास नकार दिला. 'एआयबी रोस्ट'च्या वादात आमिरने करण जोहरने त्या शोमध्ये सहभाग घेणे आणि वापर केलेल्या अपशब्दांची टिका केली होती. त्यावेळी किरण या कार्यक्रमाला पाठिंबा देताना दिसली होती. मात्र शनिवारी आमिरने याविषयी नंतर बोलणार असल्याचे सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूडच्या इतर महत्वाच्या बातम्या...