आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Top News: 'बजरंगी भाईजान' सेन्सॉरकडून पास, मिळाले 'UA' सर्टिफिकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बजरंगी भाईजान'च्या पोस्टरमध्ये सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा)
मुंबई- सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने पास केले आहे. बोर्डाने याला 'UA' सर्टिफिकेट दिले आहे. अर्थातच हा प्रौढ चाहतावर्गच पाहू शकतो. सूत्रांच्या सांगण्यानुसार, निर्मात्यांची इच्छा होती, की 'U' सर्टिफिकेट मिळावे, जेणेकरून लहान मुलेसुध्दा पाहू शकतील.
चांगली बातमी अशी आहे, की सेन्सॉर बोर्डाने सिनेमामध्ये कोणतीही काटछांट केलेली नाहीये. दिग्दर्शक कबीर खान, निर्माता-अभिनेता सलमान खानसह संपूर्ण टीमला भिती होती, की भारत-पाकिस्तानच्या संबंधावर आधारित या सिनेमातील काही सीन कापले जातील. मात्र सेन्सॉरला सिनेमामध्ये काहीच आपत्तीजनक वाटले नाही. या सिनेमाने दोन्ही देशांच्या संबंधामध्ये सुधार करण्याचा हा एक प्रयत्न असल्याची जाणीव सेन्सॉरला झाली. दोन्ही देशांना प्रेम, शांतीचा संदेश देण्यात आला आहे.
कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमान खानशिवाय करीना कपूर खान, हर्षाली मल्होत्रा (बालकलाकार) आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा येत्या 17 जुलैला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक, वाचा बॉलिवूडच्या इतर महत्वाच्या बातम्या...