आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wait Is Over : आमिर खान स्टारर बहुचर्चित \'दंगल\'चा Trailer रिलीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आमिर खानच्या आगामी दंगल या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. आमिरने गुरुवारी सकाळी ट्विटरवर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करुन लोकांना त्यांचे मत विचारले आहे. आमिरने ट्रेलर रिलीज करुन ट्विट केले, ''Here goes...Tell me what you think. Love.''
आमिरने बुधवारी रात्री ट्विटरवर ट्रेलर रिलीज करणार असल्याची माहिती देत म्हटले होते, की तो रात्रभर झोपू शकत नाहीये. सिनेमाचा ट्रेलर फेसबुक आणि ट्विटरवर लाँच व्हायला अवघे 12 तास शिल्लक राहिले आहेत. आशा करतो, लोकांना सिनेमाचा ट्रेलर आवडेल.
प्रसिद्ध कुस्तीपटू महावीर सिंह फोगट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. सिनेमात साक्षी तन्वरने आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख आणि सान्या मल्होत्राने त्याच्या मुलींची भूमिका साकारली आहे.
3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये उत्कृष्ट सीन्स आणि दमदार डायलॉग्स बघायला मिळतात. मुलगा होईल आणि मग तो माझं कुस्तीत गोल्ड मेडल आणण्याचं स्वप्न पूर्ण करेल हा विचार मनाशी धरलेला बाप. जेव्हा आपल्या मुलींमध्ये मुलाची छबी पाहतो. आणि त्यानंतरचा काळ हा या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. यामध्ये महावीर त्याचा मुलींना म्हणतो, "सिल्वर जीतेगी तो आज नहीं तो कल लोग तन्ने भूल जावेंगे, अगर गोल्ड जीती तो मिसाल बन जावेगी। और मिसाले दी जाती है बेटा भूली नहीं जाती।"

नितेश तिवारी दिग्दर्शित हा सिनेमा 23 डिसेंबर रोजी रिलीज होणारे. ट्रेलर प्रेक्षकांना नक्कीच भावणारा आहे. आमिर खानने नेहमीप्रमाणे या सिनेमांतूनसुद्धा वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे.

'दंगल'च्या ट्रेलरची झलक फोटोजमधून बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर... सोबतच सिनेमाचे निवडक ऑन लोकेशन फोटोजसुद्धा तुम्ही पुढे बघू शकता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...