आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडी, अॅक्शन, इमोशनने भरलेला फुल मसाला एंटरटटेनर आहे \'जुडवा 2\' चा Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - डेव्हीड धवनच्या प्रचंड गाजलेल्या सिनेमांपैकी एक असलेल्या 'जुडवा' चित्रपटाचा सिक्वल 'जुडवा 2' चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. वरुण धवनची दुहेरी भूमिका आणि त्याच्याबरोबर जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्या अभिनयाची मजा प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. डेवीड धवन यांचा दिग्दर्शक म्हणून हा 44 वा सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. कॉमेडी, अॅक्शन, इमोशन असा संपूर्ण मसाला या चित्रपटात असल्याचे ट्रेलरवरून पाहायला मिळत आहे. त्यात जुडवामधील 'उंची है बिल्डींग' आणि 'टन टना टन टारा' ही दोन गाणे असल्याने  एकूणच मजा आणखी वाढली आहे. काही वेळापूर्वीच मुंबईत ट्रेलर लाँच करण्यात आला, यावेळी वरुण, जॅकलिन, तापसी, डेवीड धवन यांची उपस्थिती होती. 

जुडवा 2 बाबत काय म्हणाले सेलेब्स.. 
- चित्रपटातील बाप्पा हे गाणे अनवाणी पायांनी शूट करण्यात आले आहे. 
- करिश्मा कपूरने उत्कृष्ट काम केले असल्याने दबाव अधिक होता असे जॅकलिन म्हणाली.  
- वरुण म्हणाला चित्रपटाचा पहिला पार्ट लहान असताना खूप एन्जॉय केला आहे. 
- संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन पाहण्यासारखा चित्रपट आहे.
- लंडनमधील बेस्ट लोकेशन्सवर शुटिंग झाले. 
- डेवीड धवन यांनी दिग्दर्शिक केलेला हा 44 वा चित्रपट आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रेलर लाँचचे Photos.. अखेरच्या स्लाइडवर पाहा Video...
बातम्या आणखी आहेत...