आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावतीचे सौंदर्य, रतनसिंहचा राजपुती बाणा, अन् खिलजीचे क्रौर्य, भन्नाट आहे \'पद्मावती\'चे Trailer

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतोय. पण त्याची झलक दाखवणारा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये संजय लीला भन्साळी यांची खास शैली दिसून आली. संपूर्ण ट्रेलरमध्ये राणी पद्मावतीच्या रुपातील दीपिका पदुकोणचे सौंदर्य, राणा रतरसिंहच्या भूमिकेतील शाहीद कपूरचा राजपुती बाणा आणि खिलजीच्या भूमिकेत असलेल्या रणवीर सिंहचे क्रौर्य हे अगदी स्पष्टपणे दिसत आहे. अत्यंत मोजके डायलॉग असूनही भव्य दिव्यपणाच्या माध्यमातून छाप पाडण्यात ट्रेलरला यश मिळालेले पाहायला मिळत आहे. 

13.03 वाजता रिलीज केले ट्रेलर
1303 साली रावल सिंह आणि खिलजी यांच्यात पहिली लढाई झाली होती. त्यामुळे सोमवारी दुपारी 13.03 वाजताच हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्विटर, यूट्यूबवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. चला तर मग पाहुयात पद्मावतीची एक झलक.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पद्मावतीच्या ट्रेलरमधील काही स्क्रीनशॉट आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा, व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...