आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रिलीज झाला मधुर भंडारकरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'चा TRAILER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'फॅशन', 'हिरोइन'सारख्या स्त्री प्रधान सिनेमे बनवण्यासाठी प्रसिध्द असलेला दिग्दर्शक मधूर भंडारकरचा 'कॅलेंडर गर्ल' या सिनेमाचे ट्रेलर रिलीज झाला आहे. जवळपास अडीच मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये 5 मॉडेल्सच्या लाइफमध्ये येणा-या चढ-उताराची कहाणी दाखवण्यात आली आहे.
ट्रेलरमधून स्पष्ट दिसते, की हा सिनेमा मोठ्या-मोठ्या कॅलेंडर शूटच्या माध्यमातून लोकप्रिय मिळवलेल्या मॉडेल्स आयुष्यावर आधारित आहे. मात्र ग्लॅमरच्या मागे दडलेली या अभिनेत्रींची दु:खद कहाणीसुध्दा मधुरने आपल्या सिनेमांतून दर्शवली आहे.
सिनेमाची कहाणी पाच सुंदर मॉडेल्स आणि त्यांच्या ग्लॅमरस लाइफच्या अवतीभोवती फिरणारी आहे. सिनेमातून आकांक्षा पुरी, अवनी मोदी, कायरा दत्ता, रूही सिंह आणि सतरूपा पाइन या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. निर्माती संगीता अहिरचा हा सिनेमा 25 सप्टेंबरला रिलीज होत आहे.