आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांचा \'फिवर\' वाढवायला येतेय गौहर खान, बघा Trailer आणि Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'फिवर' या थ्रिलर-सस्पेन्स सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. एका कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भोवती या सिनेमाची कथा दाखवण्यात आल्याचे ट्रेलरवरून कळते. अ‍ॅक्शनसोबतच या सिनेमातून अनेक हॉट आणि बोल्ड सीन्स बघायला मिळणार आहे. अभिनेता राजीव खंडेलवाल याची यात मुख्य भूमिका आहे.

राजीव खंडेलवालसोबतच 'बिग बॉस' फेम अभिनेत्री गोहर खान झळकणारेय. या सिनेमात गौहरचा हॉट लूक लक्ष वेधून घेतोय. गौहरसोबतच गेम्मा अ‍ॅटकिनसन, कॅटेरिना मुरिनो, व्हिक्टोर बॅनर्जी आणि अंकिता मकवाना या अभिनेत्रींचाही हॉट अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणारेय.
या सिनेमातील कॉन्ट्रॅक्ट किलरचा अ‍ॅक्सिडेंट होतो आणि त्याला पूर्वीचं काहीही आठवत नाही. त्यानंतर अनेक गोष्टी घडतात. या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव झवेरी यानी केले असून रवी अग्रवाल, महेश बालेकुंदरी, अजय छाब्रिया आणि रजथ मंजुनाथ यांनी निर्मिती केली आहे. तर तब्बल नऊ संगीतकारांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. येत्या 22 जुलै रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि बघा 'फिवर'चा ट्रेलर...