आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता तुषार कपूर झाला पप्पा, पण बाळाला मम्मीच नाही, नाव ठेवले \'लक्ष्य\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर वडील झाला आहे. कुठल्याही सिनेमात तो वडिलांची व्यक्तिरेखा साकारत नसून खऱ्याखुऱ्या आयुष्यात तुषार बाप झाला आहे. लग्नापूर्वीच आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि सरोगसीच्या माध्यमातून तुषारने सिंगल पॅरेंट होण्याचा निर्णय घेतला. तुषार कपूरने सरोगसीद्वारे एका मुलाला जन्म दिला असून त्याचं लक्ष्य असं नामकरण करण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आहे.
- ‘पिता होण्याचा अनुभव अत्यंत रोमांचकारी आहे. लक्ष्यचा पिता होणं ही माझ्यासाठी अत्यानंदाची गोष्ट आहे. हा आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. देवाच्या दयेने आणि जसलोक रुग्णालयातील उत्कृष्ट वैद्यकीय पथकामुळे माझ्यासारख्या एकल पालकांसाठी हे वरदान ठरलंय’ अशा भावना तुषार कपूरने व्यक्त केल्या आहेत.
- तुषारचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि आई शोभा कपूर यांनीही आजी-आजोबा झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
- ते म्हणाले, ‘आम्ही तुषारच्या निर्णयाचं स्वागत करतो. आमच्यासाठी हा सुखद अनुभव आहे.''
- ''तुषार हा उत्तम मुलगा असून त्याने आतापर्यंत सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या आहेत. त्यामुळे वडिलांची भूमिकाही तो व्यवस्थित निभावेल यात शंका नाही.''

या सेलिब्रिटींनीही घेतली सरोगसीची मदत...
- बॉलिवूडमध्ये सरोगसीची मदत यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी घेतली आहे. शाहरुख खानपासून ते आमिर खानपर्यंत अनेक सेलेब्सच्या घरी या तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळाचा जन्म झाला आहे.
- शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबरामचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. गौरी-शाहरुख यांना आर्यन आणि सुहाना ही दोन मुले होती. मात्र तिस-या मुलाच्या जन्मासाठी त्यांनी सरोगसीची मदत घेतली.
- आमिर खानचा मुलगा आझादचा जन्म IVF च्या मदतीने झाला. सरोगसीच्या माध्यमातून ५ डिसेंबर २०११ रोजी आझादचा जन्म झाला.
- सरोगसीच्या माध्यमातूनच वयाच्या चाळीशीत दिग्दर्शिका फराह खान आई झाली. ११ फेब्रुवारी २००८ रोजी तिने दोन मुली आणि एका मुलाला जन्म दिला.
- लग्नाच्या दहा वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये या तंत्रज्ञानाच्या मदतीने सोहेल खान आणि सीमा खान यांच्या घरी योहानचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा निर्वाणचा जन्म नॉर्मल प्रेग्नेंसीच्या माध्यमातून झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, संबंधित छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...