आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नच बलिये 4'ची विजेती टीव्ही अॅक्ट्रेस दलजीतने नव-यावर लावला मारहाणीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोची विजेती जोडी दलजीत कौर आणि शालीन भनोट यांचा लवकरच घटस्फोट होणार आहे. दलजीतने नवरा शालीनवर मारहाण केल्याचा आणि परस्त्रीशी संबंध असल्याचा आरोप लावला आहे. दलजीतने सांगितले, की तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून मुलासाठी दुधाचा खर्च कोठून करावा हा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झाला आहे.
'कुलवधू'च्या सेटवर झाली होती भेट
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 27 वर्षीय दलजीतने शालीनवर गंभीर आरोप लावले आहेत. दलजीतने सांगितले, ''शालीनसोबत माझी पहिली भेट 2006 मध्ये 'कुलवधू' या मालिकेच्या सेटवर झाली होती. तेथेच आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. 'नच बलिये'च्या चौथ्या पर्वाचे आम्ही विजेतेही ठरलो होतो. त्यानंतर आम्ही लग्न केले. मात्र लग्नाच्या दुस-याच दिवसापासून आमच्यात वितुष्ठ निर्माण व्हायला सुरुवात झाली. माझी सासू लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंमुळे आनंदी नव्हती. त्यांनी माझ्याशी बोलने सोडून दिले होते. माझे वडील निवृत्त कर्मचारी आहेत आणि आम्ही तिघी बहिणी आहोत. शालीनच्या कुटुंबीयांना जे हवे होते, ते द्यायची माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती.''
गर्भवती असताना शालीनने केले दुर्लक्ष
दलजीतने सांगितले, ''जेव्हा मी प्रेग्नेंट होते, तेव्हा शालीनने माझी मुळीच काळजी घेतली नाही. याकाळात मला अस्थमाचा अटॅक आला होता, मात्र शालीन मला डॉक्टरांकडे घेऊन गेला नाही. शालीनने माझी सिझेरियन डिलिव्हरी करायलाही नकार दिला होता. त्याच्या मते मला काहीच त्रास नव्हता आणि मी त्यावेळी नाटकं करत होती. घरी परतल्यानंतर शालीनने मुलगा शारवच्या वॅक्सिनेशनकडेही लक्ष दिले नाही. तो मला कसलीच साथ देत नव्हता. यावरुन त्याचे दुस-या स्त्रीसोबत संबंध असल्याचे माझ्या लक्षात आले. एकदा तर त्याने माझ्या वडिलांसमोरच मला मारहाण केली. त्यामध्ये माझ्या पायाला दुखापत झाली होती. एकेदिवशी सर्वकाही ठिक होईल या आशेवर मी होते. मात्र त्याने मला मारहाण करणे सुरु ठेवले.''

दलजीतने पुढे सांगितले, ''सततच्या मारहाणीला कंटाळून मी वडिलांकडे बंगळूरुला आले. शालीन सुधारेल असे वाटले, म्हणून मी त्याच्याकडे परतले. माझे पॅरेंट्स या निर्णयामुळे नाराज झाले. अनेक महिने ते माझ्याशी बोलले नाहीत. 27 एप्रिल रोजी शालीन बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये एका तरुणीला किस करत होता. मला याची माहिती मिळताच मी तेथे पोहोचली. त्यावेळी शालीनने माझा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र माझ्या मोलकरणीमुळे मी वाचले. त्यानंतर शालीनच्या विरोधात मी पोलिसांत तक्रार दाखल केली. शालीन श्रीमंत आहे, त्याने जामीन मिळवला. शालीनला शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे.''
कॉल सेंटरमध्ये काम करायला तयार
दलजीतने सांगितले, की तिचा मुलगा आता शाळेत जातो. तिचा बँक बॅलेन्स आता संपला आहे. मी पूर्णपणे ढासळली आहे. जमा असलेले सर्व पैसे संपल्याने मुलासाठी साधा दुधाचा खर्च कोठून करावा, हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. मुलाचे चांगले संगोपन करण्यासाठी मी एखाद्या कॉल सेंटरमध्येही काम करायला तयार आहे.
शालीनने सांगितले, मुलाला मिस करतो...
याप्रकरणी दलजीतचा नवरा शालीन म्हणतो, ''मी प्रेम करुन लग्न केले होते. ब्रेकअप दुर्दैवी आहे. मी कुटुंबाला जोडून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. मी दलजीतच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि मुलगा शारवला खूप मिस करतो. दोन महिन्यांपासून मी शारवला भेटलो नाहीये. त्याची खूप आठवण येते.''
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या यापूर्वी कोणकोणत्या अभिनेत्रींनी नवरा किंवा बॉयफ्रेंडवर लावलाय मारहाण केल्याचा आरोप...