आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TV Actress Pratyusha Banerjee Gave Money To Parents And Boyfriend

प्रत्यूषाने आई-वडिलांना दिले होते 2.5 कोटी; लिव्ह इन बॉयफ्रेंडमुळे होती डिप्रेशनमध्ये?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बालिका वधू' या मालिकेतील 'आनंदी'च्या भूमिकेने घराघरात पोहोचल्या प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिस चौकशीत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे, प्रत्युषाने तिचे आई-वडील व लिव्ह इन बॉयफ्रेंड राहुल राज सिंहच्या अकाउंटवर रुपये ट्रान्सफर केले होते. ही रक्कम कोटींच्या घरात होती.

दरम्यान, प्रत्युषाने 15 दिवसांपूर्वी कांदिवली येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रत्युषाची आत्महत्या की हत्या, या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. तिचा लिव्ह इन बॉयफ्रेंड राहुल मात्र संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

कोणत्या कारणामुळे डिप्रेशनमध्ये होती प्रत्युषा?
- पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रत्यूषाने मागील 4 वर्षात तिच्या आई-वडिलांना 2.5 कोटी रुपये दिले होते.
- इतकेच नव्हे तर मागील 10 महिन्यात त‍िने राहुलच्या बॅंक अकाउंटवर 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते.
- प्रत्युषाकडे आई-वडील व राहुल सारखी रुपयांची मागणी करत होते, हे देखील पोलिस चौकशीत उघडकीस आले आहे.
- या कारणामुळे प्रत्युषा डिप्रेशनमध्ये होती. या परिस्थितीत ती आई-वडिलांचे फोन देखील घेत नव्हती.

फिल्म प्रॉडक्शनचा बिझनेस सुरु करण्याच्या विचारात होता राहुल
- राहुल फिल्म प्रॉडक्शनचा बिझनेस सुरु करायचा होता. त्यासाठी त्याने प्रत्युषाकडे मोठी रक्कम मागितली होती.
- राहुलसोबत लिव्ह इनमध्ये राहात असताना प्रत्युषाने तिच्या आई-वडिलांशी कॉन्टॅक्ट बंद केला होता. ती त्यांचे फोनही घेत नव्हती, असेही पोलिस चौकशीत समोर आले आहे.
- प्रत्युषाच्या दोन्ही बॅंक अकाउंटवर 75 लाख रुपये आहे.

पुढील स्लाइडवर वाचा....
> दोन महिन्यांची प्रेग्नेंट होती प्रत्युषा...
> औषध, टॅक्सीसाठी मोलकरणीकडून पैसे उधार घ्यायची प्रत्युषा?