आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरदर्शनवर होणार अक्षयच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा'चा टीव्ही प्रिमियर, अक्षयने केले Post

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वच्छ भारत' अभियानवर आधारित 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहे. उद्या म्हणजे 17 सप्टेंबर, रविवार रोजी सकाळी 10.30 वाजता प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 

पत्रकार परिषदेत दिली होती माहिती..
अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, हरियाणातील गावांमध्ये सरपंच त्यांच्या गावातील लोकांना मोफत हा चित्रपट दाखवत आहेत. तसेच उत्तर प्रदेशातही अनेकठिकाणी मोफत हा चित्रपट दाखवण्यात आल्याने अक्षय म्हणाला होता. त्याचवेळी त्याने सांगितले होते की, लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी म्हणून लवकरच हा चित्रपट दूरदर्शनवरही दाखवला जाणार आहे. मात्र एवढ्या लवकर तो दूरदर्शनवर येईल याची मात्र शक्यता नव्हती. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, अक्षयने सोशल मीडियावर केलेली पोस्ट...
बातम्या आणखी आहेत...