आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिव्हीच्या 'अनिता भाबी'ने गुपचूप केले लग्न! 10 वर्षांपासून BF बरोबर होती Live In मध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील अनिता भाबी म्हणजे सौम्या टंडनने गुपचूप विवाह उरकला असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. सौम्याने काही दिवसांपूर्वी तिचा बँकर बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंह याच्याबरोबर एका खासगी समारंभात लग्न उरकले असल्याचे समजते आहे. सौम्या गेल्या 10 वर्षांपासून सौरभला डेट करत होती. लग्नाचा सोहळा अत्यंत साधेपणाने उपकण्यात आला. मुंबईत झालेल्या या इव्हेंटमध्ये दोन्ही फॅमिलीतील सदस्य, नातेवाईक आणि निवडक मित्र यांचा समावेश होता.

काय म्हणते सौम्या..
एका वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार सौम्याला जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, मला यावर काहीही कमेंट करायचे नाही. माझ्या जीवनाबाबत मी कोणाला उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्या खासगी जीवनात मी काय करते याच्याशी लोकांचा संबंध नाही, असे ती म्हणाली.

जानेवारीत सुटीवर जाणार...
इतर काही सुत्रांच्या माहितीनुसार सौम्या जानेवारीमध्ये सुटीवर जाण्याचे प्लॅनिंग करत आहे. त्याबाबत सौम्याने प्रोडक्शन हाऊसलाही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सौम्याने सांगितले होते की, ती 10 वर्षांपासून सौरभला डेट करत असून तो तिच्यासाठी मित्र आणि गाईड दोन्ही आहे. कॉलेपासून एकमेकांच्या जवळ आलेले हे कपल मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अनिता भाबी म्हणजेच सौम्या टंडनचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...