आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो बीचवर करत होता 'टॉयलेट', ट्विंकलने फोटो केला पोस्ट, म्हणाली हा आहे 'पार्ट टू..'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेम कथा' चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला आहे. पण चित्रपट रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यातच अक्षयच्या पत्नीने त्याचा सिक्वल म्हणजे 'टॉयलेट..'चा पार्ट 2 तयार केला आहे. 'टॉयलेट..' च्या या पार्ट 2 चा पहिला सीन शूट करून ट्विंकलने सोशल मीडियावर शेयरही केला. झाले असे की ट्विंकल ने बीचवर टॉयलेट करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आणि त्याला 'टॉयलेट पार्ट 2' म्हटले आहे. 

इन्स्टाग्रामवर शेयर केला फोटो.. 
शनिवारी सकाळी सुमारे सव्वा 11 वाजता ट्विंकल खन्नाने एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यात एका व्यक्तीकडे ती इशारा करत असल्याचे दिसते आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये लांब समुद्राच्या बीचवर एक व्यक्ती उघड्यावर टॉयलेट करत असल्याचे दिसत आहे. ट्विंकलने हा फोटो पोस्ट करत लिहिले, 'गुड मॉर्निंग.. मला वाटते हा आहे, 'टॉयलेट एक प्रेम कथा पार्ट 2' चा पहिला सीन. अक्षय कुमार आणि भूमीचा चित्रपट मागच्या आठवड्यात रिलीज झाला असून चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट 100 कोटी क्लबच्या जवळ पोहोचला आहे. 
बातम्या आणखी आहेत...