आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू निगमचे ट्विटरला अलविदा, गायक अभिजीतचे अकाऊंट सस्पेंड केल्याच्‍या निषेधार्थ निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारा गायक अभिजीतचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. अभिजीतचे अकाऊंट सस्पेंड केल्याच्या निषेधार्थ सोनू निगमनेही ट्विटर सोडले आहे. असा नियम असेल तर 90 टक्के अकाऊंच बंद करावे लागतील, असे सोनू निगम अभिजीतच्या समर्थनार्थ म्हटला होता. अभिजीतने जेएनयूमधील माजी उपाध्यक्ष शेहला रशीद हिच्या विरोधात वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर त्याचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. 

अभिजीतने मंगळवारी सायंकाळी शेहला रशीदच्या विरोधात काही ट्वीट्स केले होते. अभिजीतचे विधान अत्यंत वादग्रस्त असे होते.  त्यानंतर आता अभिजीत यांच्या अकाऊंटवर गेले असता, त्यावर Account Suspended असा मॅसेज येत आहे. प्राथमिक माहितीनुसार अभिजीत यांनी केलेल्या वादग्रस्त ट्वीटनंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या, त्यामुळे त्यांचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. 

सोनू म्हणाला 90 टक्के अकाऊंट्स बंद व्हायला हवे 
अभिजीतच्या मदतीला सोनू निगम धावून आला आहे. अभिजीतचे अकाऊंट खरंच बंद करण्यात आले असेल तर, अभद्र शिवगाळ, धमक्या आणि कट्टरवाद या कारणांमुळे तर 90 टक्के अकाऊंट्स बंद व्हायला हवीत, असे त्याने पोस्ट केले. त्यानंतर काही वेळाने सोनूने स्वतःचे ट्विटर अकाऊंट बंद केले. 

ट्विटरची पॉलिसी 
ट्विटरच्या पॉलिसीनुसार या ठिकाणी एखाद्याच्या विरोधात अपमानकारक पोस्ट केल्यास किंवा अभद्र भाषेचा वापर केल्यास, त्या व्यक्तीचे अकाऊंट सस्पेंड केले जाते. ट्विटरच्या पॉलिसीमध्ये हे स्पष्टपणे म्हटले आहे की, अशा स्थितीमध्ये अकाऊंट कायमचे बंद केले जाऊ शकते. 
 
नेमका कशावरून झाला वाद.. अभिजीतने का केले वादग्रस्त ट्वीट.. सोनू निगमने केलेले ट्वीट.. पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...