आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter War: Sonakshi Sinha Angry After A Fan Asks Her When Will You Show Your Body

जेव्हा चाहत्याने विचारले, 'बॉडी कधी दाखवणार?', सोनाक्षीने दिले सडेतोड उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सोनाक्षी सिन्हा, सोबत चाहत्याचे एक टि्वट - Divya Marathi
फाइल फोटो : सोनाक्षी सिन्हा, सोबत चाहत्याचे एक टि्वट
मुंबई- सोनाक्षी सिन्हा एका टि्वटरवर खूप भडकली आहे. एका चाहत्याचे तिला टि्वट करून विचारले, 'सोनाक्षी सिन्हा तू आम्हाला कधी तुझी बॉडी दाखवणार आहे? तू कधी बिकिनी परिधान करणार आहे?' यावर सोनाक्षीने सडेतोड उत्तर दिले आहे. सोनाक्षीने त्याला उत्तर देत लिहिले, 'हा प्रश्न तुझ्या आई किंवा बहिणीला विचार आणि नंतर सांग त्या काय उत्तर देतात.' हा प्रकार रविवारी (7 फेब्रुवारी) घडला.
सोनाक्षीने डिलीट केले स्वत:चे टि्वट...
नंतर सोनाक्षीने स्वत:चे टि्वट डिलीट करून टाकले. तिने टि्वट डिलीट करताना लिहिले, 'मी माझे टि्वट डिलीट करतेय. कारण त्याने माफी मागितली आहे. आशा आहे तो आणि त्याच्यासारखे इतर लोक शिकले असतील, की महिलांचे प्रोफेशन काहीही असो, त्यांना नेहमी आदर करावा.'
सोमवारी एका महिला फॅनने केला पलटवार...
सोमवारी सोनाक्षी पुन्हा एकदा चर्चेत आली. एका फिमेल फॅनने तिला भाषण न देण्याचा सल्ला दिला. ही फइमेल फॅन त्या मेल फॅनचा सपोर्ट करत होती. आदिती गुप्ता नावाच्या या फॅनने लिहिले, 'पैशांसाठी बॉडी विकणा-या बॉलिवूड अभिनेत्रींनी आम्हाला हे सांगण्याची गरज नाहीये, की कोणत्या गोष्टीची लाज वाटावी.'

सोनाक्षीने येथेही उत्तर दिले. तिने लिहिले, 'आम्ही... म्हणजे तूसुध्दा त्याच कॅरेक्टरची आहेस. तू महिलांच्या नावावर कलंक आहेत. जी अशाप्रकारच्या घटिया लाइन शेअर करतेय'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा Tweets...