आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात बुडालेल्या कन्नड अभिनेत्यांचे मृतदेह सापडले, माश्यांनी केली अशी अवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मस्ती गुडी’ या कन्नड सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सोमवारी (7 नोव्हेंबर) एक धक्कादायक घटना घडली. चित्रीकरणादरम्यान घडलेल्या या घटनेमध्ये दोन कलाकार बेपत्ता झाल्याचे वृत्त दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झाले होते. दोन्ही कलाकारांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत होती. दोन्ही कलाकारांचे मृतदेह सापडले आहेत. अभिनेता उदयच्या पार्थिवाचे एक छायाचित्र समोर आले आहे. 48 तासांत माश्यांनी मृतदेह छिन्नविछिन्न केल्याचे दिसून येत आहे. उदयच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. अनिलचा मृतदेह मिळाला...
‘मस्ती गुडी’ या कन्नड सिनेमात उदय आणि अनिल हे काम करत आहेत. अनिलचा मृतदेह गुरुवारी रेस्कू टीमला मिळाला आहे.

सोमवारी घडली दुर्घटना...
- सिनेमातील एका दृश्यात उदय आणि अनिल यांना टीप्पागोंदनाहल्ली जलाशयात उडी मारायची होती. त्याप्रमाणे या दोघांनी पाण्यात उडी मारली. - पण बराच वेळ होऊनही ते पाण्याबाहेर न आल्यामुळे त्या परिसरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते.
- दरम्यान, या दोघांसह सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता दुनिया विजय यानेही पाण्यात उडली मारली होती. पण, त्याला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला.
- मिळालेल्या माहितीनुसार, उदय आणि अनिल यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर एका बोट त्यांना पाण्यातून बाहेर काढणार होती.
- पण, या बोटीस पोहचण्यास उशीर झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे म्हटले जातेय.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुनिया विजयने सेफ्टी जॅकेट घातले होते. पण, उदय आणि अनिल यांना असे कोणतेच जॅकेट देण्यात आले नव्हते.
- नागशेखर यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या ‘मस्तीगुडी’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली होती.
- सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या या दुर्घटनेमुळे कलाकारांच्या संरक्षणाचा मुद्दा आणि अतिरेकी स्टंटबाजी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, या दुर्घटनेशी संबंधित छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...