आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL: मराठी अभिनेत्रीसह तीन नट्या अटकेत, हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई पोलिसांच्‍या सामाजिक सेवा शाखेने (SSB) शहरात चालणा-या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 6 जूनच्‍या रात्री ही कारवाई करण्‍यात आली. पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत दोन टीव्ही अभिनेत्री, एक मॉडेल आणि दोन दलालांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.

गोरेगाव (पूर्व) येथील एका आलीशान मॉल बाहेर त्‍यांना अटक करण्यात आली. प्रसिद्ध फिल्‍म सिटीजवळ हे ठिकाण आहे. पीडित मॉडेल आणि अभिनेत्रीचे फोटोही ताब्‍यात घेण्‍यात आले आहेत. हे फोटो सोशल नेटवर्किंगच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना पाठवण्‍यात येत होते असेही म्‍हटले जात आहे.
या छापेमारीसाठी पुढाकार घेणारे अमित जलाल, यांनी divyamarathi.com ला माहिती दिली की, "आरोपींना गोरेगाव पूर्वमध्‍ये एका मॉलच्‍या बाहेर ताब्‍यात घेण्‍यात आले. या रॅकेटबाबत आम्‍हाला एक टीप मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांच्‍या मदतीने सापळा रचून आम्‍ही ही कारवाई केली. मी मुख्‍य दलाल सायरा आणि अशरफ उर्फ ​​अमन वर्मा, यांच्‍या संपर्कातच होतो. सामाजिक सेवा शाखेच्‍या सोबत आम्‍ही एक यशस्‍वी भांडाफोड केला."
या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना प्रकाश बहा, जलाल पुढे म्‍हणाले, " आरोपीमध्‍ये एक टेलीव्‍हिजन अभिनेत्री आहे. जिने सावधान इंडिया या मालिकेत अभिनय केला आहे. दुसरी एक मराठी अभिनेत्री आहे आणि तिसरी रँप मॉडेल आहे."
सोशल साइट्सच्‍या माध्‍यमातून चालत होता व्‍यवसाय...
> या हायप्रोफायइल वेश्‍याव्‍यवसायासाठी सोशल साइट्सचा आधार घेतला जात होता.
> तरुणींचे फोटो व्‍हाट्सअॅप, फेसबुकच्‍या माध्‍यमातून ग्राहकांपर्यंत पाठवले जात होते.
> डिंडोषी पोलिस ठाण्‍यात त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पुढील स्‍लाइडवर वाचा, एका रात्रीसाठी आकारायचे 50 हजार ते 1 लाख रुपये.... श्रीमंत व्यापारी... बडे अधिकारी होते ग्राहक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...