आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही कलाकारांच्या कारला भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू; क्रेनने असे काढले मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  पालघरजवळ झालेल्या कार अपघातात दोन टीव्ही अभिनेते आणि स्पॉटबॉयचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही गुजरात येथील शूटिंग संपवून कारमधून मुंबईला परतत होते. यावेळी  मुंबई-अहमदनगर हाईवेवर उभ्या असलेल्या एका टँकरला त्यांची कार जाऊन धडकली. कार इतकी स्पीडमध्ये होती की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारला गॅस कटरने कापून आतील लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही अभिनेते कलर्स टीव्हीच्या एका धार्मिक शोमध्ये काम करत होते. अभिनेत्याचा सुटला कारवरील ताबा...
 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख अभिनेता गगन कांग (38 साल) आणि अरजीत लवानिया (30 साल) अशी आहे. 
- हो दोघेही कलर्स चॅनलवरील 'महाकाली-अंत ही आरंभ है' या मालिकेत काम करत होते. 
- या मालिकेत गगन 'इंद्र' आणि अरजीत 'नंदी'ची भूमिका करत होते. अपघात झाला तेव्हा गगन कार चालवत होता तर अरजीत आणि स्पॉटबॉय मागे बसले होते. 
- गुजरातच्या उमबेरगाव येथून शूटिंग संपवून हे तिघे गोरेगाव येथील घरी परतत होते. सकाळी 11.15 वासता गगनचे कारवरील कंट्रोल सुटले आणि टँकरशी टक्कर होऊन त्यांचा मृत्यू झाला. 
 
कारमध्ये सापडल्या बीअरच्या बाटल्या..
- अपघातानंतर पोलिसांना कारच्या बॅक-फ्रंट सीटवर बीअरच्या बाटल्या चिप्सचे पॅकेट मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारची स्पीड 100kmph पेक्षाही जास्त होती. पोस्टमार्टम रिपोर्टस आल्यानंतरच कळेल की कोणी मद्यसेवन केले होते की नाही.
- पोलिसांनी अपघात मृत्यू झाल्याची केस दाखल केली आहे. टँकरच्या ड्रायव्हरची चौकशी केली जात आहे पण त्याच्यावर अद्याप कोणताच गुन्हा दाखल केलेला नाही. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा,  अपघाताची काही दृश्ये..
 
बातम्या आणखी आहेत...