भोपाळः मुंबई उच्च न्यायालयाने 'उडता पंजाब'च्या बाजुने निकाल दिला आहे. फक्त १ कटसह सिनेमाच्या रिलीजला मंजुरी देण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सिनेमाला १३ कट्स आणि आक्षेपार्ह शब्द वगळून सिनेमाला A सर्टीफिकेट देऊन सिनेमाच्या रिलीजला परवानगी दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने सिनेमाला केवळ १ कट दिला आहे. पुढच्या ४८ तासांत सिनेमाला नवं A सर्टीफिकेट देण्याचे आदेश न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहे.
खरं तर यापूर्वी अनेकदा रिलीजपूर्वी सिनेमे सेन्सॉर बोर्डाच्या तावडीत सापडले आहेत. नेतेमंडळीसुद्धा वेळोवेळी याविषयी वक्तव्ये देत असतात. समजा, जर उडता पंजाबसारखा वाद महागाई आणि नेत्यांच्या सद्यस्थितीवर आधारित असता तर तो कार्टुनिस्टच्या नजरेतून कसा असेल. बघा dainikbhaskar.comचे कार्टूनिस्ट हरिओम तिवारी यांच्या नजरेतून हा सगळा वाद... सिनेमाविषयी असलेला वाद काय आहे?
पहिले ८९ कट, मग ९४ आणि आता १३
सेन्सॉर बोर्डाने शिव्यांची भाषा, काही आक्षेपार्ह वाक्ये व शब्द, पंजाब वगैरे शहरांची नावे अशा विविध १३ बाबी वगळण्याचे निर्देश निर्माती कंपनी फँटम फिल्म्सला दिले होते. त्याला आव्हान देणा-या कंपनीच्या याचिकेवर जवळपास दोन दिवस सुनावणी घेतल्यानंतर न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने निकाल सोमवारपर्यंत राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने उडता पंजाबच्या बाजुने कौल देत केवळ एक कटसह सिनेमाच्या रिलीजला मंजुरी दिली.
समोरासमोर आलेत निर्माते, नेते आणि सेन्सॉर बोर्ड
- ‘उडता पंजाब‘मधून पंजाब, राजकारण आणि निवडणुकीबद्दलचे संदर्भ काढून टाकण्याची शिफारस सेन्सॉर बोर्डने केल्याने या सिनेमाचे निर्माते अनुराग कश्यप यांनी नाराजी व्यक्त करत उत्तर कोरियातील हुकुमशाही राजवटीत राहतोय की काय असा प्रश्न उपस्थित केला होता.
- सिनेमाच्या या वादावर सूचना प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठौड यांच्या म्हणण्यानुसार, जर कोणाला सेन्सॉरच्या निर्णयावर आक्षेप आहे तर त्यांना अपिल करण्याचा अधिकार आहे. तर दुसरीकडे अकाली दलने पंजाबची बदनामी करण्याचा आरोप लावत सिनेमावर बंदीची मागणी केली.
- तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सिनेमाला आपला पाठिंबा दर्शवला होता.
- ट्विटर युजर्सनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत म्हटले होते, की सिनेमा न बघता, तो उत्कृष्ट आहे, असे ते कसे म्हणू शकतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, #Udtapunjab वर आधारित CARTOONS...