आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडता पंजाब: अनुरागला म्हणाले मोदींचे मंत्री, \'हा नॉर्थ कोरिया आहे? मत घ्या\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा 17 जूनला रिलीज होणार आहे. परंतु आता चर्चा आहे, की सिनेमाची रिलीज डेट 5 जुलै होणार आहे. - Divya Marathi
सिनेमा 17 जूनला रिलीज होणार आहे. परंतु आता चर्चा आहे, की सिनेमाची रिलीज डेट 5 जुलै होणार आहे.
मुंबई/दिल्ली: शाहिद कपूरचा 'उडता पंजाब' सिनेमावरील चालू असलेला वाद थांबायचे नावच घेत नाहीये. सिनेमाचा निर्माता अनुराग कश्यपच्या भारताची तुलना नॉर्थ कोरियासोबत केल्याच्या टि्वटने मोदी सरकारचे मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले, 'तुम्हाला वाटते का तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये आहात का? येथे मत घेतली जातात, लोकशाही आहे.' सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटच्या रिव्हाइजिंग कमिटीने या सिनेमातून 89 सीन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सिनेमा 17 जूनला रिलीज होणार होता, मात्र आता चर्चा आहे, की 5 जुलैला रिलीज होऊ शकतो.
सिनेमावर वाद का?
- या सिनेमाचा परिणाम पंजाबमध्ये 2017मध्ये होणा-या विधानसभा निवडणूकीवर होऊ शकतो.
- अनेक पक्ष ड्रग्सचा मुद्दा निवडणूकीच्या काळात निशाण्यावर आणतील. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये एक स्थानिक नेता निवडणूक जिंकण्यासाठी मेनिफेस्टोसोबत ड्रग्सचे पॅकेट वाटतो.
- ड्रग्सला कशाप्रकारे दोन-तीन प्रॉडक्ट्ससोबत मिळून बनवतात आणि ड्रग्सच्या कारखान्याचे संपूर्ण कथा सिनेमात आहे. ड्रग्सची फॅक्ट्री कशाप्रकारे चालते हेदेखील सिनेमांत दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
- सिनेमात शाहिद कपूर ड्रग अॅडिक्ट पॉप सिंगरच्या भूमिकेत आहे. तो आपल्या गाण्यात ड्रग्सविषयी माहिती देतो.
- तो म्हणतो, सर्वांनी ड्रग्सचे सेवन करायला हवे. सिनेमात आलिया भटसुध्दा ड्रग अॅडिक्ट आहे. व्यसन पूर्ण करण्यासाठी ती पुरुषांसोबत संबंध ठेवते.
पंजाबमध्ये ड्रग्सचे आकडे...
- यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 134 किलो हेरोईन पकडल्या गेली.
- इंटरनॅशनल मार्केटमध्ये याची किंमत एक कोटी रुपये/किलो आहे.
- मागील पाच वर्षांत 8400 किलो अमली पदार्थ पकडल्या गेले. किंमत 60 हजारांपासून 1.20 लाखांपर्यंत/किलो आहे.
- 1500 किलो अफू पकडण्यात आला.
निर्माता अनुरागच्या टि्वटवर मोदींच्या मंत्रीचे उत्तर...
- राठोड म्हणाले, 'तुम्हाला वाटत, तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये आहात. येथे मतदान घेतले जाते. लोकशाही आहे.' हे उत्तर त्यांनी अनुरागच्या नॉर्थ कोरियामध्ये राहण्याच्या टि्वट दिले.
- 'जे निर्माते बोर्डाच्या निर्णायाने नाराज आहेत, त्यांनी रिव्हाइजिंग कमिटी किंवा ट्रिब्यूनलकडे जावे.'
- मागील पाच महिन्यांत अनेक निर्मात्यांनी सीबीएफसीच्या निर्णयावर सहमती दाखवली नाही. त्यांनी ट्रिब्यूनलमध्ये अर्ज केला आणि नंतर सहमती दर्शवली.
- असे काही असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता.
आतापर्यंत काय-काय झाले?
- पंजाबमध्ये येत्या निवडणूकीकडे पाहता, मंगळवारी (7 जून) अरविंद केजरीवालपासून राहुल गांधीपर्यंत अनेकांनी यावर वक्तव्य केले.
- सेन्सॉर बोर्डाला या सिनेमातून 'पंजाब' शब्द काढून टाकायचा आहे. या मुद्यावर राजकिय नेत्यांच्या वक्तव्यानंतर #UdtaPolitics ट्रेंड करू लागले आहे.
- अनुराग कश्यपच्या नॉर्थ कोरियाच्या वक्तव्यावर केजरीवाल यांनी टि्वट करून म्हटले, 'मी तुमच्याशी सहमत आहे.'
- तसेच राहुल गांधी यांचे म्हणणे आहे, 'पंजाबमध्ये ड्रग्सची समस्या आहे. सिनेमाला सेन्सॉर केल्याने ते संपुष्यात येणार नाहीये. त्यासाठी आपण काहीतरी उपाय शोधायला हवा.'
- त्यानंतर कश्यप म्हणाला, 'मी काँग्रेस, AAP आणि इतर पक्षांच्या नेत्यांना सांगू इच्छितो, की त्यांनी या वादापासून दूर राहावे.'
- 'हा वाद माझ्या आणि सेन्सॉरशिपमधला आहे. माझी लढाई सेन्सॉर बोर्डात बसलेल्या एका हुकूमशहा व्यक्तीसोबत आहे. हा माझा नॉर्थ कोरिया आहे.'
- 'इतर लोकांनी आपआपली लढाई लढावी. मी माझी लढाई लढेल.'
सेन्सॉर बोर्डाचा काय आक्षेप आहे?
- दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या या सिनेमातून फिल्म सर्टिफिकेशन ट्रिब्यूनलने (एफसीएटी) 'पंजाब' शब्द काढून टाकण्यास सांगितला आहे.
- काही दिवसांपूर्वी ट्रिब्यूनलने सिनेमाला सर्टिफिकेट न देता रेव्हिसिंग कमिटीमध्ये पाठवला होता. आता बातमी आहे, की निर्मात्यांना सिनेमातून 'पंजाब' शब्द काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.
- इतकेच नव्हे तर सिनेमातून पंजाबमधील ड्रग्स रॅकेटच्या रेफरेन्सलासुध्दा काढण्याची मागणी केली आहे.
- एफसीएटीनुसार, सिनेमात काही असेही सीन आहेत, ज्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे.
- सिनेमात पंजाबमधील तरुणांना ड्रग्सच्या व्यसनाचा मुद्दा उचलला आहे.
- 'उडता पंजाब'मध्ये शाहिद कपूर, करीना कपूर खान, आलिया भट आणि दिलजीत दोसांझने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
केंद्र सरकारचे काय म्हणणे आहे?
- दुसरीकडे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्य मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले, 'सेन्सॉर बोर्डाचे काम सर्टिफिकेट देण्याचे आहे. बंदी घालण्याचे नाही.'
- केंद्र सरकारचे म्हणणे आहे, की या वादाशी त्यांचा काहीच संबंध नाहीये.
- सेन्सॉर बोर्डाच्या एका अधिका-याने सांगितले, 'उडता पंजाब'च्या 6-7 डायलॉगबाबत रिव्ह्यू कमिटीने सिनेमाच्या निर्मात्यांना कळविले आहे. मात्र, अद्याप नोटीस सादर केली नाहीये.
- पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुखबीर बादल यांच्या सांगण्यानुसार, 'पंजाब बॉर्डर स्टेट आहे. येथे पाकिस्तान आणि आफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतात. पंजाबमधून ड्रग्स संपूर्ण देशात पसरतात. पंजाब पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे ड्रग्स येथे पकडली जाते. परंतु बदनाम पंजाबची होते.'
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सेन्सॉर बोर्डावर नाराज आहे बॉलिवूड...
बातम्या आणखी आहेत...