आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडता पंजाब: 89 नव्हे सेन्सर बोर्डाने लावले 13 कट्स, सिनेमात नकोत या 8 शहरांची नावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उडता पंजाबमध्ये शाहिद कपूरचा लूक - Divya Marathi
उडता पंजाबमध्ये शाहिद कपूरचा लूक
मुंबई/दिल्ली: शाहिद-करीना-आलियाचा 'उडता पंजाब' या आगामी सिनेमाविषयी बॉम्बे हायकोर्टात गुरुवारी (9 जून) सुनावणी झाली. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने बुधवारी (8 जून) कोर्टाला सांगितले, की त्यांनी 13 कट्ससह 'A' सर्टिफिकेट देण्याचा सल्ला दिला आहे. 'टॉमी' आणि 'चिट्टा वे'सारखे शब्द, 14 शिव्या आणि पंजाबच्या आठ शहरांची नावे काढण्यास आणि 89 कट्सच्या निर्णयाला योग्य असल्याचे सांगितले होते. निहलानीने म्हणाले होते, ते मोदीचा चमचा आहेत.
बुधवारी कोर्टात काय झाले?
- निर्माता अनुराग कश्यपने बॉम्बे हायकोर्टात सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात अपील केले आहे. यावर सुनावणी होणार आहे.
- बुधवारी कोर्टाने सुनावणीदरम्यान बोर्डाला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले होते. 13 कट्ससह 'A' सर्टिफिकेटच्या सूचनेनंतर निर्माते गुरुवारी उत्तर देतील.
- त्याचदरम्यान सिनेमाची रिलीज डेटसुध्दा 17 जूनहून जुलैमध्ये शिफ्ट करण्यात आली.
- त्यापूर्वी, सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन पहलाज निहलानी आणि निर्माता अनुराग कश्मिर यांच्यात दिवसभर आरोपा-प्रत्यारोप सुरु होते.
- अनुरागने निहलानीवर आरोप लावला, 'निर्मात्यांनाच नेहमी प्रमाणिकपणा का सिध्द करावा लागतो?'
- यावर निहलानीने उत्तर दिले, 'सिनेमात पंजाबच्या 70% लोकांना ड्रग्सचे सेवन करताना दाखवण्यात आले आहे. सिनेमा बनवण्यासाठी आम आदमी पार्टीने पैसे दिले आहेत. सीन कापण्याचा निर्णय पूर्ण पॅनलचा आहे, माझ्या एकट्याचा नाही.'
सेन्सॉर बोर्डाने कट केले हे 13 सीन्स...
1. सिनेमाच्या सुरुवातीचे पंजाबचे साइन बोर्ड काढावे.
2. जालंधर, पंजाब, चंदीगढ, अमृतसर, तरनतारन, जशनुपूरा, अंबेसर, लुधियाना आणि मोगाच्या बोर्ड आणि डायलॉग्समधून हे काढून टाकावे.
3. पहिल्या गाण्यातील 'चिट्टावे' शब्द काढून टाकावा.
4. दुस-या गाण्यातील 'टॉ दी कॉक जेव्हे चिट्टी चिट्टी' आणि 'कोक' बडर्स काढावे.
5. तिस-या गाण्यातील सरदाराचा एक आक्षेपार्ह सीन काढण्यास सांगितला आहे.
6. 14 शिव्या काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.
7. 'इलेक्शन', 'एमपी', 'पार्टी', 'एमएलए', 'पंजाब' ,'पार्लियामेंट' शब्द काढून टाकावे.
8. ड्रग्ससाठी इंजेक्शन घेणारे क्लोजअप शॉट्स काढण्यास सांगितले आहेत.
9. गर्दीसमोर टॉमी सिंहचे पात्र लघवी करतानाचा सीन काढण्याचा सल्ला दिला आहे.
10. 'जमीन बंजर ते औलाद कंजर', ही लाइन काढून टाकण्यास सांगितली आहे.
11. कुत्र्याने नाव जॅकी चैन नसावे, हा डायलॉग बदलावा.
12. पहिला डिस्क्लेमर ऑडियो/व्हिडियोमध्ये असावा. तो असा आसावा, 'सिनेमा ड्रग्सचा वाढता परिणाम आणि त्याच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईवर आहे. मान्य आहे, की यासाठी सरकार आणि पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र ही लढाई लोकांच्या सहकार्याशिवाय जिंकली जाऊ शकत नाही.'
13. ऑडियो/व्हिडियोमध्ये दुसरा डिस्क्लेमर मूव्ही फिक्शनविषयी आसावा.
पुढे वाचा, निहलानी म्हणाले, 'होय, मी मोदींचा चमचा'...
बातम्या आणखी आहेत...