नवी दिल्ली- वादात अडकलेल्या ‘उडता पंजाब’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य कापून तो प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी केली असतानाच वादामुळे प्रचंड चर्चेत अालेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आॅनलाइन लीक झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने १७ जून रोजी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.
चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यावरून सेन्सॉर बोर्ड आणि निर्माते अनुराग कश्यप यांच्यात वाद झाला होता. कश्यप यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केवळ एक दृश्य वगळण्याचा निकाल दिला. त्यानुसार शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
17 जूनला होणार रिलीज...
- दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या या सिनेमात शाहिद कपूर, आलिया भट, करीना कपूर आणि दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा 17 जूनला रिलीज होणार आहे.
- 'उडता पंजाब'च्या सून कापण्याच्या विरोधात निर्मात्यांनी याचिकेवर मुंबई हायकोर्टने सोमवारी निर्णय दिला.
- हायकोर्टने निर्मात्यांना सिनेमातून एक सीन कापण्यास आणि तीन डिस्क्लेमर दिखवण्यास सांगितले होते.
- यापूर्वी सेन्सॉर बोर्डने सिनेमातील 13 सीन काढून टाकण्यास सांगितले होते. निर्मात्यांनी त्याच्या विरोध दर्शवला होता.
या सीनवर लावणार कट...
- सिनेमात लोकांसमोर टॉमी सिंह (शाहिद कपूर) लघुशंका करतो. हा सिनेमा सिनेमातून काढण्यास सांगितला आहे. हा कट नंबर 9 होता.
3 डिस्क्लेमर लागतील...
- पहिला- आम्ही ड्रग्सचा वापर प्रमोट करत नाहीये.
- दुसरा- अश्लिल शब्द केवळ वास्तव सांगण्यासाठी आहेत. प्रमोट करण्यासाठी नाही.
- तिसरे- हा सिनेमा एखाद्या राज्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी नाहीये.
WHAT NEXT: अद्याप थांबला नाहीये वाद...
- 17 जूनला फिल्म सर्टिफिकेशन अँड अपीलिएट ट्रिब्यूनलमध्ये या प्रकरणाची सुनावणी आहे.
- या दिवशी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सिनेमाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. हायकोर्टच्या आदेशावर सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले आहे. यावर
रिपोर्ट बेंच सोपवली जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लीक झालेल्या फुटेजचे फोटो...