आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 च्या दशकात लाखो रुपये फिस घ्यायचा हा अॅक्टर, घरात सापडल्या होत्या अश्लिल CD

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका चित्रपटाच्या सीनमध्ये अॅक्ट्रेस विजय शांतीबरोबर सुमन तलवार. - Divya Marathi
एका चित्रपटाच्या सीनमध्ये अॅक्ट्रेस विजय शांतीबरोबर सुमन तलवार.
मुंबई - साऊथ स्टार सुमन तलवार सध्या चित्रपटांपासून दूर असले तरी एक काळ असाही होती, जेव्हा 26 व्या वर्षी त्यांचे करिअर साऊथ इंडस्ट्रीमध्ये पीकवर होते. दक्षिणेत अनेक खलनायक प्रसिद्ध झाले आहेत. पण सुमन यांनी प्रसद्धी आणि कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे सोडले होते. सुमन यांनी रजनीकांतच्या 'शिवाजी द बॉस'(2007) पासून अक्षय कुमारच्या 'गब्बर इज बॅक'(2015) बरोबरच अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका केली होती. एप्रिलमध्ये त्यांचा ओडिया चित्रपट 'सीता रामा नका बाहाघरा' रिलीज झाला आहे. 

80 च्या दशकात घ्यायचे लाखो रुपये फिस 
- 80 च्या दशकात सुमन साऊथ चित्रपटांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले अॅक्टर होते. 
- सुमनबरोबर सर्वांनाच काम करण्याची इच्छा होती. अगदी साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीबरोबर त्यांच्या कामाची तुलना व्हायची. 
- रिपोर्टनुसार 80 च्या दशकात ते 5 लाख रुपये फिस घ्यायचे. त्यावेळच्या मानाने ही फिस फार जास्त होती. 

1988 मध्ये आला डाऊनफॉल 
- 1988 मध्ये सुमन यांच्या जीवनात अशी वेळ आली की, त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली होती. 
- 18 मे ला पोलिस त्यांच्या घरी गेले आणि काही पोर्न व्हिडीओ जप्त केले. 
- सुमन यांच्यावर ब्लू फिल्म बाळगल्याचा गुन्हा दाखल जाला आणि त्यांना अटक झाली. 
- सुमन यांच्यावर 3 तरुण मुलींचे अपहरण, रेप आणि बळजबरी ब्लू फिल्ममध्ये काम करायला लावल्याचे आरोप होते. 
- ते आरोप किती खरे होते हे समोर आले नाही, पण मीडियात याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे एका रात्रीत त्यांला ब्लॅक लिस्ट करण्यात आले. 

डायरेक्टरने परत दिले नाही काम 
- सुमन यांच्यावर लागलेल्या या आरोपांमुले फिल्ममेकर आणि प्रोड्युसर्सनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला. 
- सुमन यांना त्याकाळातील हातात असलेलेही सर्व प्रोजेक्ट गमवावे लागले होते. 
- पण सुमन यांनी हार मानली नाही. त्यांनी हळू हळू पुन्हा चित्रपटांत नाव कमवायला सुरुवात केली. 
- आज 57 वर्षांचे सुमन दक्षिणेतील प्रुमख खलनायकांपैकी एक आहेत. तो कोट्यवधी रुपये फिस घेतात. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सुमन तलवार यांच्याबाबत..