आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी पत्रकारांना आमिरला भेटण्याची नसायची उत्सुकता, असा होता 'तो' संघर्षाचा काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कयामत से कयामत तक'च्या सेटवर मन्सुर खान, आमिर खान आणि नासिर हुसैन - Divya Marathi
'कयामत से कयामत तक'च्या सेटवर मन्सुर खान, आमिर खान आणि नासिर हुसैन
 
एकेकाळी सिनेपत्रकांराना आमिर खानपेक्षा त्‍याचा चुलत भाऊ मन्‍सूर खान यांना भेटण्‍याची जास्‍त इच्‍छा असायची, यावर तुमचा विश्‍वास बसेल का?  मात्र हे सत्‍य आहे आणि त्‍याची काही कारणेही आहेत. त्‍याकाळी आमिर खानपेक्षा मन्‍सूर खान यांची मुलाखत घेण्‍यासाठी सर्व पत्रकार खूप उत्‍सूक असायचे. 

या कारणामुळे पत्रकार नव्हते आमिरला भेटण्यास इच्छुक.. 
ही गोष्‍ट आहे आमिर खानचा पहिला सिनेमा 'कयामत से कयामत तक' (1988) रिलीज होण्‍यापूर्वीची. सिनेमाची प्रसिध्‍दी सुरु झाली होती. सिनेमाच्‍या पीआरओने  सर्व पत्रकारांना फोन करुन सांगितले, की सिनेमा प्रदर्शनासाठी तयार असून आमिर खान आणि मन्‍सूर खान मुलाखतींसाठी सज्ज आहेत. तुम्‍ही पहिले कोणाची मुलाखत घेणे पसंत कराल? तेव्‍हा सोलो मुलाखतींचा काळ होता. तेव्‍हा पत्रकारांनी क्षणाचाही विलंब न लावता उत्‍तर दिले होते, मन्‍सूर खान. यामागे काही कारणे होती, एकतर आमिर खानच्‍या व्‍यक्तिमत्‍वामध्‍ये त्‍यावेळी विशेष असे स्‍टार मटेरियल दिसत नव्‍हते. तो फक्‍त एक स्‍मार्ट महाविद्यालयीन विद्यार्थी वाटायचा. असे वाटायचे, की चार-पाच सिनेमांनतर आमिर खान फिल्‍म इंडस्‍ट्रीमधून गायब होऊन जाईल. मन्‍सूर खानविषयी जास्‍त उत्‍सूकता यासाठी होती, की ते अत्‍यंत यशस्‍वी करमणूकप्रधान सिनेमे बनवणारे निर्माते-दिग्‍दर्शक नासिर हुसेन यांचे सुपुत्र होते. 

तसे पाहता आमिर खानचे वडील ताहिर हुसैन हे देखील अनेक यशस्‍वी सिनेमांचे निर्माते होते. मात्र नासिर हुसेन यांची बातच और होती. त्‍यांचा स्‍व:तचा एक करिश्‍मा होता. 'जब प्यार किसीसे होता है',  'कारवा' अशा अनेक सुपरहिट सिनेमांची त्‍यांनी निर्मिती केली होती. अशा निर्माता- दिग्‍दर्शकाचा मुलगा दिग्‍दर्शनात उतरत आहे म्‍हटल्‍यावर त्‍याला पहिले भेटले पाहिजे, असाच विचार त्याकाळी सर्व पत्रकारांनी केला होता. 

पुढे वाचा, मॅटिनी शोमध्येच पत्रकारांना दाखवण्यात आला होता 'कयामत से कयामत तक'... 
 
बातम्या आणखी आहेत...