आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंतीवरुन उडी घेऊन बिग बींच्या घरात शिरला होता हा तरुण, अटकनंतर जामीनावर सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे. बुलेट बनवारीलाल यादव असं या 23 वर्षीय तरुणाचे नाव आहे. बुलेट यादवने सुरक्षा रक्षकांना चकवा देत, बच्चन यांच्या जुहूतील घरात घुसण्याचा प्रयत्न केला. बुलेट यादवने जलसा बंगल्याच्या शेजारी असलेल्या सिटीबँक भिंतीवरुन उडी मारुन जलसा बंगल्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी पकडल्यामुळे, हा प्रकार उघडकीस आला.
बुलेट यादव हा मूळचा बिहारचा असून, सध्या पुण्यात राहात असल्याचं सांगण्यात येत आहे. तो स्वत: भोजपुरी गायक असल्याचं सांगतो. अमिताभ बच्चन यांना गाणं ऐकवण्यासाठी आपण ही धडपड केल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान, बुलेट यादवविरोधात जुहू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...