आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Police Control Room Got A Call From Unknown Person Threatened To Kill Actor Salman Khan

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी उघड केली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मात्र ही धमकी स्वतः सलमानला आली नसून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांना 11 दिवसांपूर्वी हा धमकीचा फोन आला होता. याबाबत चौकशी सुरु आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रथमदृष्ट्या कोणीतरी चेष्टा मस्करी करत असल्याचे दिसत आहे. मात्र याबाबत सखोल चौकशी करुन धमकी देणाऱ्याची ओळख पटवली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.