आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे नूतन यांची 24 वर्षीय नात, बघा कुटुंबीयांसोबतचे Unseen Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांनी या जगाला अलविदा करुन 25 वर्षांचा काळ लोटला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी मिस इंडियाचा (1952) किताब आपल्या नावी करणा-या नूतन यांनी वयाच्या 23 व्या वर्षी लग्न केले होते. 1959 मध्ये त्यांनी लेफ्टिनेंट कमांडर रजनीश बहन यांच्यासोबत विवाह केला होता. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांचा मुलगा मोहनीश बहलचा जन्म झाला. आईच्या पावलावर पाऊल ठेवत मोहनीश यांनीही सिनेसृष्टीत पदार्पण केले. मोहनीश यांना प्रनूतन आणि कृष्णा या दोन मुली आहेत. 

24 वर्षांची आहे नूतन यांची नात 
'मैंने प्यार किया' (1989), 'हम आपके हैं कौन' (1994), 'हम साथ-साथ है' (1999) सह अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेले अभिनेते मोहनीश यांनी 1992 साली अभिनेत्री एकता सोहिनी (आता बहल) सोबत लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. थोरली मुलगी प्रनूतन आता 24 वर्षांची असून धाकटी मुलगी कृष्णा आठ वर्षांची आहे.

लाइमलाइटपासून दूर आहे प्रनूतन
मोहनीश आणि त्यांचे कुटुंब लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळेच या कुटुंबाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाहीये. मागील वर्षी प्रनूतनने कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली. तिला डान्सिंगमध्ये विशेष रुची आहे. एका मुलाखतीत मोहनीश म्हणाले होते, की ते दोन्ही मुलींसाठी अतिशय प्रोटेक्टिव आहेत. थोरली मुलगी  प्रनूतन त्यांची सर्वात मोठी क्रिटिक आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, कुटुंबीयांसोबतचे नूतन यांची नात प्रनूतनचे खास Photos...
बातम्या आणखी आहेत...