आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवीनपासून ते दिव्या भारतीपर्यंत, आजही उघड होऊ शकले नाही या 9 सेलेब्सच्या मृत्यूचे रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः परवीन बाबी हिच्या संपत्तीचा वाद तिच्या मृत्यूच्या 11 वर्षांनी संपला आहे. मात्र आजही तिच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. 70 आणि 80 च्या दशकात सिल्व्हर स्क्रिनवर आपला जलवा दाखवणारी ब्युटी अॅक्ट्रेस 22 जानेवारी 2005 रोजी राहत्या घरी रहस्यमय अवस्थेत मृत आढळली होती. परवीनला अंमली पदार्थांचे व्यसन जडले होते. तीन दिवस तिच्या घरात काहीच हालचाल होत नसल्याचे शेजा-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. त्यावेळी तिच्या दाराबाहेर वृत्तपत्र आणि दुधाच्या पिशव्या तशाच पडलेल्या दिसल्या, शिवाय घरातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता परवीन त्यांना मृतावस्थेत आढळली होती. आजही तिच्या मृत्यूविषयी सस्पेन्स कायम आहे.

इमारतीवरुन दिव्या भारती पडली होती की तिला ढकलण्यात आले होते?
5 एप्रिल 1993 च्या रात्री 11 वाजता मुंबईतील वर्सोवा स्थित तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन पडून अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी दिव्या केवळ 19 वर्षांची होती. दिव्या भारतीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, यावरुन मुंबई पोलिस पडदा उचलू शकलेले नाहीत. कारण पोलिसांकडे सबळ पुरावा नव्हता. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या दिव्या भारतीने हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘शोला और शबनम’, ‘दिल आशना है’ आणि ‘दीवाना’ हे तिचा काही गाजलेले सिनमे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अशाच आणखी काही डेथ मिस्ट्रीजविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...