आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'हे धाडस चित्रपटांपुरते ठेव..\' मुंबई पोलिसांनी वरुण धवनला बजावले; चालान देऊन पाठवले घरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  मुंबई पोलिसांनी अभिनेता वरुण धवनला चलान घरपोच केलं आहे. ट्रॅफीक जाममध्ये अडकलेला असताना कारच्या बाजूला असलेल्या रिक्षातील मुलीसोबत सेल्फी काढल्याने त्याला हे चलान पाठवण्यात आले आहे. नियमांचा भंग केल्याबद्दल हे चलान पाठवण्यात आल्याचे कळत आहे. मात्र कोणते नियम वरुण धवनने तोडले आहेत हे कळू शकलेले नाही. मुंबई पोलिसांनी एक ट्विट करून वरुण धवनला इशाराही दिला आहे, की पुन्हा असे करशील तर आत्तापेक्षा कठोर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर वरुण धवनने माफी मागितली आहे.

 

एका इंग्रजी दैनिकामध्ये वरुण धवनचा हा फोटो छापून आलेला आहे, त्यावरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ''हे धाडस चित्रपटांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरुणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ...'' अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला बजावले आहे.

 

वरुण धवनचा माफीनामा...
वरुण धवनने याविषयी माफी मागणारे ट्वीट केले आहे. "मी माफी मागतो. आम्ही ट्रॅफिक सिग्नलवर होतो आणि आमची कार थांबली होती. मला माझ्या फॅनच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. पण यापुढे मी सुरक्षेकडे लक्ष देईल," असे ट्वीट वरुणने केले आहे.  

 

पुढे वाचा, मुंबई पोलिस आणि वरुण धवन यांचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...