आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: श्रद्धा कपूर-वरुण धवनच्या 'ABCD 2' चा TRAILER OUT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2015 मधील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असलेल्या आगामी 'ABCD 2' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अचंबित करणारे स्टंट्स आणि उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्सेसची झलक पाहायला मिळतेय. हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'एबीसीडी' या सिनेमाचा सिक्वेल आहे.
रेमो डिसुजा दिग्दर्शित या 'ABCD 2' मध्ये प्रभूदेवा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर इम्प्रेसिव्ह आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर आपापल्या भूमिकेत अगदी फिट दिसत आहेत. पडद्यावरील दोघांची जोडी हॉट आणि सिझलिंग दिसतेय.
डिस्ने मुव्हीजच्या बॅनरमध्ये तयार झालेला हा सिनेमा येत्या 19 जून रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.