आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varun Dhawan Shraddha Kapoor Starrer ABCD 2 Poster Release

'एबीसीडी 2'चे पोस्टर रिलीज, वरुण-श्रद्धाची दिसतेय सिझलिंग केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('एबीसीडी-2'च्या पोस्टरवर श्रद्धा कपूर आणि वरुण धवन)
मुंबईः वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर 'एबीसीडी-2' या सिनेमाचे ऑफिशिअल पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणारी श्रद्धा कपूर आणि वरुण धवनची जोडी पोस्टरवर बरीच हॉट आणि सिझलिंग दिसतेय. पोस्टरमध्ये श्रद्धा पिंक आणि ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये तर वरुण विदआउट शर्टमध्ये हॉट दिसतोय.
'एबीसीडी-2' हा 2013मध्ये रिलीज झालेल्या 'एबीसीडी' या सिनेमाचा सिक्वेल आहे. 'एबीसीडी' या सिनेमात प्रभूदेवाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सिक्वेलमध्ये प्रभूदेवा, श्रद्धा आणि वरुणसोबत थिरकताना दिसणार आहे.
या डान्स बेस्ड सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसुजाने केले आहे. डिस्ने मुव्हीच्या बॅनरमध्ये तयार झालेला हा सिनेमा येत्या 19 जून रोजी रिलीज होणार आहे.