आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरूण धवनला करायचीय मराठी फिल्म,‘पण रितेश मला Seriously घेत नाही’ वरूणची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेमो फर्नांडिसच्या ‘ABCD-2’ आणि श्रीराम राघवनच्या ‘बदलापूर’ ह्या चित्रपटांमध्ये वरूण धवनने एका मराठी तरूणाची भूमिका केली होती. ‘बदलापूर’ चित्रपटाच्यावेळी त्याने आपल्या जीम इन्स्ट्रक्टरकडून आणि ‘ABCD-2’ वेळी त्याने श्रध्दा कपूरकडून मराठीचे धडे गिरवल्यावर आता वरूणला बहूधा मराठी भाषेची गोडी निर्माण झाली असावी. कारण वरूण धवनला मराठी चित्रपटात काम करायंचय.
स्वत: वरूणनेच आपली ही इच्छा दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केलीय. मराठीत काम करण्यासाठी तो सध्या रितेश देशमुखच्या खूप मागे लागलाय. पण रितेश त्याला गंभीरतेने घेत नाही अशी divyamarathi.comशी बोलताना त्याने तक्रार केलीय.
वरूण म्हणतो, “सध्या मराठीत खूप चांगले चांगले सिनेमे येतायत. मलाही एखाद्या मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. रितेश आता मराठीतला एक निर्माता झाल्याने मी त्याला ह्याविषयी बोललो सुध्दा. मला छोटीशी का होईना पण एखादी तरी भूमिका दे, असं मी त्याला म्हणालो. पण का कोणास ठावूक तो मला ह्याबाबतीत गांभिर्याने घेतच नाहीये. त्याला बहूदा मी मस्करी करतोय, असंच वाटतं असावं. पण मला खरंच मराठीत काम कराचंय.”
वरूण लहानपणापासून मुंबईत रहिल्याने त्याने मराठी सिनेमे पाहिलेत. त्याच्या वडिलांच्या चित्रपटातही मराठी कलाकारांनी काम केलंय. त्यामूळे त्याला मराठीची थोडीफार जाण आहेच.
त्याने नुकतीच ‘दिलवाले’ चित्रपटात एक विनोदी भूमिका केलीय. विनोदाबाबतीत त्याला मराठीतले दादा कोंडकेंचे सिनेमे आवडतात. तो म्हणतो, “ते तर विनोदी सिनेमांबाबत एक आयकॉन आहेत.”
सलमान खानने लय भारी सिनेमात एक छोटासा रोल केला होता. आता विद्या बालनही मराठीत काम करतेय. त्यापाठोपाठ वरूण धवन मराठीत एखादी भूमिका करत असेल, तर मराठी सिनेमात एक नवा ट्रेन्ड नक्कीच सुरू होईल.