आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता बिग बी आणि शाहरुखच्या रांगेत उभा राहणार वरुण धवन, मदाम तुसादमध्ये दिसणार स्टॅच्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरुण धवन सध्या 'जुड़वां-2' चे सक्सेस एन्जॉय करत आहे. त्याच्या या चित्रपटाचा समावेश 200 कोटी क्लबमधील चित्रपटांत होत आहे. त्यात आता मदाम तुसादमध्ये वरुणचा वॅक्स स्टॅच्यू लावला जाणार असल्याची बातमी आली आहे. नुकतेच फिल्ममेकर करण जोहरने ट्वीटद्वारे सांगितले की, वरुणचा वॅक्स स्टॅच्यू हाँग काँगच्या म्युझिममध्ये लावला जाणार आहे. याठिकाणी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान आणि हृतिकसारख्या स्टार्सनंतर आता वरुण नव्या पिढीतील सर्वात कमी वयात म्युझियममध्ये स्थान मिळवणारा अॅक्टर बनला आहे. 

फोटो पोस्ट करून फॅन्सला दिली माहिती..
- वरुणनेही त्याच्या ट्वीटर हँडलवर फॅन्सला ही माहिती दिली. 
- त्याने पोटो पोस्ट करत लिहिले,  "madametussauds coming soon"
- या फोटोत वरुण स्टॅच्यूसाठी मोप आणि पोज देताना दिसत आहे. 

वरुणने 5 वर्षांत केले हे 9 चित्रपट.. 
- वरुण धवनने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईअर' द्वारे 2012 मध्ये डेब्यू केला होता. 
- त्याचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आतापर्यंत वरुणने 'मै तेरा हीरो'(2014), 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया'(2014), 'बदलापूर'(2015), 'ABCD-2'(2015), 'दिलवाले'(2015), 'ढिशुम'(2016), 'बद्रीनाथ की दुल्हनिया'(2017) आणि 'जुडवां-2' अशा चित्रपटांत काम केले आहे. 
- 2018 मध्ये वरुण धवनचे 'सुई धागा: मेड इन इंडिया' आणि ऑक्टोबर हे चित्रपट रिलीज होणार आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मदाम तुसादमध्ये लावलेले यापूर्वीचे पुतळे... 
बातम्या आणखी आहेत...