आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरातच दुस-यांदा हलला वीणा मलिकच्या घरी पाळणा, गोंडस मुलीला दिला जन्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः असद बशीर खान खटक मुलगा अवराम (डावीकडे), मुलगी अमाल आणि पत्नी वीणा मलिकसोबत.) - Divya Marathi
(फोटोः असद बशीर खान खटक मुलगा अवराम (डावीकडे), मुलगी अमाल आणि पत्नी वीणा मलिकसोबत.)

एन्टरटेन्मेंट डेस्कः पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक दुस-यांदा आई झाली आहे. बुधवारी युएसमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वीणाचे पती असद बशीर खान खटक यांनी ट्विटरवर आपल्या नवजात मुलीचे छायाचित्र शेअर केले आहे. असद आणि वीणा यांनी आपल्या मुलीचे नाव अमाल असद खान ठेवले आहे. छायाचित्रासोबत असद यांनी ट्विटरवर लिहिले, "Alhamadullilah on this Blessed day of Hajj our princess Amal Asad Khan arrives into our world. Thank you @iVeenaKhan". असद आणि वीणा यांना एक मुलगा असून त्याचे नाव अवराम खान खटक असे आहे.
वर्षभरात हलला दुस-यांदा पाळणा
वीणा मलिकच्या मुलीचा जन्म मुलाच्या जन्माच्या ठिक वर्षभरात झाला आहे. यावर्षी 23 सप्टेंबरला तिने मुलीला जन्म दिला. यापूर्वी म्हणजे 22 सप्टेंबर 2014 ला तिचा मुलगा अवरामचा जन्म झाला होता. वीणाने 'तेरे प्यार में', 'तेरे नाल लव हो गया', 'जिंदगी 50-50' आणि 'सुपर मॉडल' या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे, 2013 मध्ये ती दुबईस्थित बिझनेसमन असद बशीर खान खटकसोबत विवाहबद्ध झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वीणाच्या मुलीचे छायाचित्रे, जे असद यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. सोबतच पुढील स्लाईड्समध्ये पाहा त्यांच्या मुलाची छायाचित्रे...