आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅक की हत्या; अाेम पुरी यांचा संशयास्पद मृत्यू, दोन्ही दिशांनी पोलिसांचा तपास सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाॅलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अाेम पुरी (वय ६६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांचे पार्थिव विवस्त्र स्वरूपात फ्लॅटमधील स्वयंपाकघरात अाढळले. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने अाेम पुरींची प्राणज्याेत मालवल्याची चर्चा हाेती. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत असल्याचे समाेर आल्याने त्यांच्या मृत्यूकडे पाेलिसही संशयाने पाहू लागले अाहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी अनेक तारे- तारकांच्या उपस्थितीत अाेम पुरी यांना अखेरचा निराेप देण्यात अाला.
  
चित्रपट निर्माते खालिद किदवई गुरुवारी सायंकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत अाेम यांच्यासाेबत हाेते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘गुरुवारी रात्री अाेम पुरी यांचे पत्नी नंदिताशी भांडण झाले .’ नंदिता मुलगा ईशानसह विभक्त राहतात.  तर सूत्रांच्या मते, पतीच्या मृत्यूला खालिद व वाहनचालक मिश्रा जबाबदार असल्याचा नंदिता यांचा अाराेप अाहे. त्यावरून पाेलिसांनी दाेन तास खालिद यांची चाैकशी केली. पोलिस वाहनचालक, ईशान व अभिनेता मनाेज पाहवा यांचीही चाैकशी करणार अाहेत.
  
अाेशिवारा पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक म्हणाले, या प्रकरणाची सखाेल चाैकशी केली जात अाहे. अाेम पुरी यांच्या इमारतीत येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या नाेंदीही तपासल्या जातील. गेल्या २४ तासांत त्यांना काेण- काेण भेटले, याची माहिती घेऊन त्यांचीही चाैकशी केली जाईल. पाेलिसांच्या मते, अाेम पुरी यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते दारूच्या नशेत हाेते.

डाेक्यात अनेक जखमा  
सूत्रांच्या मते, अाेम पुरी यांच्या डाेक्यात सुमारे दीड इंच जखम अाढळून अाली.  तसेच डाेक्यात अनेक ठिकाणी रक्तस्राव झाल्याचेही शवविच्छेदन अहवाल सांगताे. स्वयंपाकघरात जिथे त्यांचा विवस्त्र मृतदेह सापडला तिथे खूप दुर्गंधीही पसरली हाेती.

चालकाला दरवाजा उघडला नाही, अन...  
शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, अाेम पुरी गुरुवारी रात्री शूटिंगवरून घरी परतले हाेते. शुक्रवारी सकाळी चालकाने त्यांचा दरवाजा ठाेठावला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चालकाने दुसऱ्या चावीने फ्लॅट उघडला तर अाेम पुरी यांचा मृतदेहच दिसून अाला. त्याने तातडीने पाेलिसांना माहिती दिली.

मुलगा ईशानला भेटण्याची इच्छा अपूर्णच  
मृत्यूपूर्वी अाेम पुरी अापल्या मुलाला भेटू इच्छित हाेते, मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. अाेम पुरी यांची भूमिका असलेला ‘रामभजन जिंदाबाद’ चित्रपट खालिद किरवई करत अाहेत. गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे दाेघे साेबतच हाेते. एका कार्यक्रमातून परतताना ते अभिनेता मनाेज पाहवा यांच्या घरीही गेले.

तिथे अाेम पुरी यांचे काेणाशी तरी पैशावरून भांडण झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास अाेम पुरी अापला मुलगा ईशानला भेटण्यासाठी पत्नी नंदिताच्या घरी गेले, मात्र तिथे नवरा-बायकाेत भांडण झाले. खाली उतरल्यावर त्यांनी मुलगा ईशानला फाेन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली; मात्र ताे पार्टीसाठी बाहेर गेलेला हाेता. त्यामुळे निराश अाेम पुरी यांनी गाडीत बसून पेग भरला व दारू संपेपर्यंत ईशान अाला तर भेटू नाही तर निघून जाऊ, असे म्हणाले. ‘मी बायकाेला पैसे, फ्लॅट, नाेकर-चाकर सर्व काही देताे, तरी मला मुलाला भेटू देत नाही,’ अशी खंतही त्यांनी खालिदकडे व्यक्त केली. त्यानंतर खालिदने त्यांना रात्री ११ च्या सुमारास घरी साेडले.
 
पुढील स्लाइडवर वाचा ओम पुरी यांचा फिल्मी सफर...आणि ओम पुरी यांना या अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली...   (अमिताभ बच्चन यांनी दिली ओम पुरींना श्रद्धांजली, शेअर केले PHOTOS)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...