मुंबई - बीव्ही राधा नावाने प्रसिद्ध कन्नड अॅक्ट्रेस बी. व्ही. बीवी राधा यांचे रविवारी निधन झाले. 70 वर्षांच्या राधा यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट सुरू होती. त्याचदरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा लगेचच मृत्यू झाला. मृत्यूनंतर राधा यांची बॉडी त्यांच्या बेंगळुरूच्या घरी नेण्यात आली.
मेडिकल कॉलेजला दान करणार पार्थिव..
- नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या अंत्य दर्शनानंतर राधा यांचे शरीर एका मेडीकल कॉलेजला दान केले जाणार आहे.
- राधा यांची तशी अखेरची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार नाहीत.
- त्यांची पती अॅक्टर आणि फिल्ममेकर केएसएल स्वामी यांचे पार्थिवही मेडिकल कॉलेजला रिसर्चसाठी डोनेट केले होते.
कँसरशी दिला होता लढा
- रिपोर्टनुसार राधा यांना यावेळी हार्ट अटॅक आल्याने त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते.
- काही दिवस अॅडमिट राहिल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- राधा यांना काही वर्षांपूर्वी कँसर झाला होता. त्यातून त्या पूर्णपणे रिकव्हर झाल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS