आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 सिनेमांत झळकलेल्या या अभिनेत्याला आता पडलीये एका वेळच्या जेवणाची भ्रांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतीश कौल गेल्यावर्षी रुग्णालयात दाखल असतानाचा फोटो आहे, इनसेटमध्ये कर्मा सिनेामतील एका दृश्यात अभिनेत्री नूतनसोबत सतीश कौल - Divya Marathi
सतीश कौल गेल्यावर्षी रुग्णालयात दाखल असतानाचा फोटो आहे, इनसेटमध्ये कर्मा सिनेामतील एका दृश्यात अभिनेत्री नूतनसोबत सतीश कौल
एन्टरटेन्मेंट डेस्कः 300हून अधिक सिनेमांत झळकलेले अभिनेते सतीश कौल यांनी आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र हा अभिनेता आता अज्ञातवासात जीवन व्यतीत करत आहे. पडद्याआड गुडूप झालाय. त्यांचा गेल्यावर्षी हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.

2014 मध्ये बाथरुममध्ये पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बरे होऊनदेखील त्यांना रुग्णालयातच दिवस काढावे लागले होते. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ''पूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होतो. मात्र उपचारांसाठी पैसे नसल्याने मला पटियालातील एका छोट्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.''
200 हून अधिक पंजाबी आणि सुमारे 100 हिंदी सिनेमांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 30 वर्षांपूर्वी अभिनेत्री नुतन यांच्यासोबत 'कर्मा' या सिनेमात सतीश यांनी त्यांच्या मुलाची भूमिका वठवली होती.

पुढे वाचा, वाईट काळात पत्नीने सोडली साथ...
अॅक्टिंग स्कूलमधून झाला आर्थिक तोटा... यांसह बरेच काही..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)