आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ यांच्या या हिरोईनचे 71 व्या वर्षी निधन, दिलीप कुमार बरोबरही केले आहे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आनंद' चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमिताभ यांच्याबरोबर सुमिता सान्याल. - Divya Marathi
'आनंद' चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमिताभ यांच्याबरोबर सुमिता सान्याल.
मुंबई/कोलकाता - आनंद चित्रपटात (1971) अमिताभ बच्चन यांच्या हिरोईन असलेल्या बंगाली अॅक्ट्रेस सुमिता सान्याल यांचे  रविवारी 71 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कोलकात्यातील देसप्रियो पार्कमधील घरी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑक्टोबर 1945 ला दार्जिलिंगमध्ये जन्म झालेल्या सुमिता यांचे खरे नाव मंजुला होते. पण पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःचे नाव सुचारिता असे ठेवले. पण फिल्ममेकर कनक मुखोपाध्याय यांनी तिचे नाव सुमिता केले. 

40 हून अधिक बांगला चित्रपटात केले काम.. 
- सुमिता यांनी 40 हून अधिक बांगला चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी 1970 मध्ये 'सगीना महतो' चित्रपटात तिने दिलीप कुमार यांच्याबरोबर काम केले होते. 
- त्यांनी 1960 मध्ये बांगला चित्रपट 'खोका बाबुर प्रत्याबर्तन'द्वारे डेब्यू केला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर, सुमिताने फिल्म एडिटर सुबोध रायबरोबर केले होते लग्न.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...