(इमरान हाश्मी, विद्या बालन)
मुंबई- मोहित सुरी दिग्दर्शित 'हमारी अधूरी कहानी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा एक म्यूजिकल रोमँटिक ड्रामा सिनेमा आहे. यामध्ये विद्या बालन, इमरान हाश्मी आणि राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित या सिनेमाचा ट्रेलर रंजक आहे.
ट्रेलरवरून स्पष्ट होते, की राजकुमार राव सिनेमात विद्या बालनच्या पतीच्या भूमिकेत आहे. तसेच इमरान हाश्मी विद्या बालनचे विवाहबाह्य अफेअर आहे.
भट्ट कॅम्पच्या सिनेमांचे वैशिष्ट म्हणजे सिनेमाचे संगीत आहे. 'हमारी अधूरी कहानी'मध्ये कम्पोजर मिथुन, जीत गांगुली आणि अमी मिश्राने यांनी सूथिंग म्यूजिक सादर केले आहे. हा सिनेमा येत्या 12 जून रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हमारी अधूरी कहानी'च्या ट्रेलरमधून घेण्यात आलेली छायाचित्रे...