आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video Preview: 110 कोटीत बनला बॉम्बे वेलवेट, अनुराग कश्यपचे सर्वकाही पणाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'बॉम्बे वेलवेट'चा प्रोमो)
या आठवड्यात 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा रिलीज झाला. फँटम फिल्म्सने फॉक्स स्टार स्टुडिओसाठी या सिनेमाची 90 कोटींमध्ये निर्मिती केली आहे. तर संपूर्ण जगात प्रिंट आणि प्रचाराचा खर्च एकुण 110 कोटींच्या घरात आहे.
संगीत, परदेशी वितरण आणि सॅटेलाइट टीव्ही हक्कातून 40 कोटींची सिनेमाने कमाई केली आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा या सिनेमाचे प्लानिंग करण्यात आले होते, त्यावेळी मोठ्या स्टारसकास्टच्या सिनेमाच्या सॅटेलाइट टीव्ही हक्कांसाठी 35 ते 40 कोटींपर्यंत सहज किंमत मिळत होती. आज सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचा निर्मिती खर्च वसूल करण्यासाठी सिनेमाचा एकुण व्यवसाय 140 कोटी होणे गरजेचे आहे.
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा स्टारर आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. अनुराग कश्यप एक प्रतिभावंत दिग्दर्शक आहे. मात्र त्यांनी आजवर कधीही 10 कोटींपेक्षाचा अधिक खर्च करुन सिनेमा बनवलेला नाही.
'बॉम्बे वेलवेट'मुळे त्यांचे व्यावसायिक गणित बदलेले आहे. सिनेमाच्या यशापयशाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे. गेल्या काही वर्षांत दोन प्रतिभावंत दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया (साहेब बीवी गँगस्टर, पान सिंह तोमर आणि फ्लॉप ठरलेला बुलेट राजा) आणि श्रीराम राघवन (जॉनी गद्दार , बदलापुर आणि फ्लॉप ठरलेला एजेंट विनोद) यांनी मिळता-जुळता प्रयत्न केला होता, मात्र ते अपयशी ठरले. त्यामुळे अनुराग कश्यप यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. या सिनेमाला यश मिळाल्यास ते समकालीन दिग्दर्शकांपेक्षा वरचढ ठरतील.
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'पीकू'ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवले आहे. हटके मनोरंजक सिनेमाने पहिल्या दिवशी 5.3 कोटींचा व्यवसाय केला. तर पहिल्या आठवड्यात या सिनेमाचा एकुण व्यवसाय 40.50 कोटी इतका आहे.
'गब्बर इज बॅक' या सिनेमाने रिलीजच्या दुस-या आठवड्यातही चांगला व्यवसाय केला आहेत. दुस-या आठवड्यात सिनेमाने 23 कोटींचा व्यवसाय केला आहे. गेल्या चार महिन्यात हिटच्या प्रतिक्षेत असलेल्या बॉलिवूडला 'गब्बर' आणि 'पीकू'ने मुळीच निराश केलेले नाही.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा, 'पीकू'चा पहिल्या आठवड्याचा व्यवसाय...