आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीवर भडकली राखी, म्हणाली, 'तिला कपडे परिधान करायचे पैसे दिले जातात'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंतने बुधवारी (15 एप्रिल) सनी लिओनवर तोंड सुख घेतले आहे. राखी म्हणाली, 'सनी लिओनला कपडे परिधान करण्याचे पैसे मिळतात आणि हे देशाचे तिच्यावरील उपकार आहेत. राखी 'जान बिगडेला' व्हिडिओ अल्बम रिलीज करण्यासाठी आली होती, यावेळी राखीने सनीविषयी असे वक्तव्य केले. या व्हिडिओमध्ये राखी खूपच बोल्ड अवतारात दिसली.
शूटिंगनंतर तिने मीडियासोबत बातचीत केली आणि पोर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्री बनलेल्या सनीवर तिने प्रखर टिका केली. राखी पुढे म्हणाली, 'तुम्ही सनी लिओनविषयी काय बोलताय? आम्ही तिच्यावर उपकार करत आहोत. आपण तिला कपडे परिधान करायचे पैसे देत आहोत. भारतीय हे समाजकार्य करत आहेत. तुम्हाला कळत आहे ना, तुम्हाला समजायला हवे हे किती मोठे समाजकार्य आहे.'
राखीने सनीसोबत तुलना केल्यानंतर सांगितले, 'माझी तुलना सनी लिओन करू नका. कारण मला जे मिळाले आहे, ते डान्स, परफॉर्म, रिअॅलिटी शो करून मिळाले आहे. मी भारतीयांची मने जिंकली. मी पोर्न स्टार नाहीये.'
राखीने यावेळी स्वत:ला ग्लॅमरस म्हणून संबोधले आणि म्हणाली, 'मी ग्लॅमरस आहे आणि तुम्ही माझी तुलना जेनेफर लोपेज आणि मेडोनासारख्या इंटरनॅशनल स्टारशी करू शकता.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'जान बिगडेला' अल्बमच्या शूटिंगदरम्यानचे राखी सावंतचे फोटो...